Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Water Crisis: पुणेकरांच्या घशाला कोरड! टँकरच्या मागणीत साडेसहा हजारांची उडी; महापालिकेचे “सात” टँकर पॉईंट्स हाऊसफुल्ल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 March 2026, 22:59

पुणे: उन्हाळा सुरू होताच पुणे (Pune Water Crisis) शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागली असून टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यातच टँकरच्या फेऱ्यांमध्ये सुमारे 6500 ने वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने टँकरची मागणी पुढील काळात अधिक वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शहरात एकूण 46068 टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी 2024-25 च्या फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 39488 इतकी होती, तर 2023-24 च्या फेब्रुवारीमध्ये 33951 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा टँकरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

उन्हाळ्याच्या काळात शहरातील काही उपनगरांमध्ये पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने टँकरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. विशेषतः धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस आणि पाषाण या भागांमध्ये टँकरची मागणी वाढत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणी वितरणाची यंत्रणा अद्याप पूर्णपणे विकसित नसल्यानेही टँकरवर अवलंबित्व वाढले आहे.

महापालिकेकडून ज्या भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही किंवा कमी दाबाने पाणी येते, त्या भागांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय नागरिकांच्या मागणीनुसार ठरावीक शुल्क आकारूनही टँकरद्वारे पाणी पुरवले जाते. खासगी टँकरचालकांनाही महापालिकेकडून शुल्क भरून पाणी घेण्याची परवानगी दिली जाते.

टँकर भरण्यासाठी पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रुंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग येथे महापालिकेने सात टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. या ठिकाणांवरून महापालिकेचे तसेच ठेकेदारांचे टँकर शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करतात. यावर्षी जानेवारी महिन्यात 42542 टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला होता, तर फेब्रुवारीमध्ये ही संख्या वाढून 46068 वर पोहोचली आहे. वाढत्या उन्हामुळे येत्या काही आठवड्यांत ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

Bhor News: भोरमध्ये थकबाकीदारांचा "बॅनर"वर पंचनामा! कर भरला नाही तर चौकात नाव येणार; नगरपालिकेची थेट कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.