Rajgurunagar News खेड, ता. 3 : कौटुंबिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ३० एप्रिल रोजी समोर आली आहे. संजीवनी लक्ष्मण कुमटकर (वय ३५, रा. राजगुरुनगर) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Rajgurunagar News

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी यांना दोन मुली होत्या. “मुलगा होत नाही” या कारणावरून पती लक्ष्मण कुमटकर हा सतत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करत असल्याचा आरोप आहे. या सततच्या मानसिक व शारीरिक छळामुळे तिचे आयुष्य असह्य झाले होते. या जाचाला कंटाळून संजीवनी यांनी राक्षेवाडी (ता. खेड) येथील विहिरीत उडी घेत आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Rajgurunagar News

याबाबत मृत महिलेचे वडील अशोक भोसले यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पती लक्ष्मण कुमटकर याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे. Rajgurunagar News








