Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 16:06

Uruli kanchan News उरुळी कांचन , ता. ३ : येरवडा कारागृहातून थरारक पळ काढून तब्बल सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ‘मोक्का’खालील कुख्यात आरोपीलाअखेर पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातून शिताफीने केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. Uruli kanchan News

अजिंक्य उत्तम कांबळे (वय ३१ वरा.टिळेकरवाडी ता.हवेली जि.पुणे) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळीकांचन येथील प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात कांबळे आणि त्याच्या साथीदारांना अटक डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. मात्र, जून २०२० मध्ये येरवडा जेलमधील खिडकीचे गज काढून सहा आरोपींनी पळ काढला. त्यातील पाच जणांना पोलिसांनी लवकरच पकडले, परंतु मुख्य सूत्रधार कांबळे वेषांतर करून, नाव बदलून आणि परराज्यात वास्तव्य करत सतत पोलिसांच्या नजरेतून सुटत राहिला. Uruli kanchan News

कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, गंभीर दुखापत, मोक्का, आर्म ॲक्ट आणि चोरीसह एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या भीतीमुळे पीडित व्यावसायिकाला गेली सहा वर्षे पोलीस संरक्षण देण्यात आले होते, यावरून त्याची दहशत स्पष्ट होते. एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कांबळे परराज्यात अवैध गावठी शस्त्र विक्रेत्यांच्या संपर्कात होता. या महत्त्वाच्या धाग्यावर काम करत पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. Uruli kanchan News

 

अखेर उरुळी कांचन येथील सोलापूर रोडवर वेषांतर करून फिरत असताना त्याला अचूक ओळखून सापळा रचत ताब्यात घेण्यात आले.
कांबळे फरारी असताना त्याला मदत करणारे कोण, त्याचे आर्थिक व गुन्हेगारी जाळे किती मोठे आहे, याचा आता सखोल तपास सुरू आहे. त्याच्या अटकेमुळे जुन्या गुन्ह्यांतील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Uruli kanchan News

सदर कामगिरी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलीस हवालदार निलेश कदम, सुनिल कोळी, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे यांच्या पथकाने केली आहे. Uruli kanchan News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.