Pune Suicide: पुणे : पुण्यातील नवी पेठ परिसरात एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवले आहे. पुण्यात एकीकडे तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारी (Crime) संपायचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वीच एका विवाहीत महिलेने बुधवार पेठेत आत्महत्या केली होती. अशातच आणखी एका तरुणाने गळफास घेतल्याचे घटना समोर आली आहे. Pune Suicide

हेही वाचा- राजकीय घराणेशाहीच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय…
मिळालेल्या माहितीनुसार, नवी पेठी परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर सुभाष पवार असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होते. सागर हा पूना हॉस्पिटलनजीक एका रूममध्ये ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहत होता. सागर बुलढाण्यातील मेहकर गावातील रहिवासी होता. पुण्यात एमपीएससीच्या अभ्यासासाठी आला होता. मागील तीन चार वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. वेगवेगळ्या परिक्षांचा अभ्यास करत होता.
सागर सोबत त्याचे काही मित्रपण अभ्यासासाठी राहत होते. शुक्रवारी दुपारच्या वेळीस सागरने दरवाजा लावून घेतला. तो खोलीत अभ्यास करत असे असं त्याच्या मित्रांना वाटू लागलं. पण बराचं वेळ तो खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे मित्रांनी दरवाजा वाजवण्यास सुरु केला तरीदेखील दरवाजा उघडला नाही. एकाने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा सागर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.
मित्रांनी मिळून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि शेजारच्यांना घटनेची माहिती दिली. ही घटना जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सागरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर खोलीची तपासणी केली. खोलीत कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही.त्यामुळे सागरने आत्महत्या का केला याचं उत्तर अद्याप समोर आले नाही. पंरतु प्राथमिक तपासात सागरने नैराश्यातून आणि परिक्षेच्या दडपणामुळे आत्महत्या केली असावाी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनेची माहिती सागरच्या कुटुंबियांना दिली. सागरच्या कुटुंबियांना सागरच्या जाण्याचा मोठा दुख झालं आहे.






