पुणे प्राईम न्यूज डेस्क: सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) विवाहसोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, त्याच्या लग्नाची पत्रिका आणि पाहुण्यांची यादी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या यादीत राज्यातील दिग्गज राजकारणी, मराठी व बॉलिवूडमधील कलाकार अशा अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश असल्याने सूरज चव्हाणचे लग्न हा एक भव्य सोहळा ठरणार आहे.

राजकीय नेत्यांचेही नावं
व्हायरल होत असलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचसोबत अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांची नावेही यात पाहायला मिळत आहेत.
अनेक स्टार अभिनेत्यांना आमंत्रण
मनोरंजन क्षेत्रातील पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड स्टार आणि ‘बिग बॉस मराठी 5’ चे होस्ट रितेश देशमुख यांचे नाव विशेषत्वाने दिसत आहे. अक्षय कुमारलाही निमंत्रण देण्यात आल्याचे पत्रिकेत नमूद आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.
गायक कलाकारांमध्ये चंदन कांबळे, उत्कर्ष शिंदे तसेच अंकिता वालावलकर यांच्या पती कुुणाल भगत यांची नावे आहेत.
सूरज चव्हाणचा विवाह 29 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.11 वाजता माऊली गार्डन हॉल, सासवड–जेजुरी रोड, पुरंदर तालुका (जिल्हा पुणे) येथे संपन्न होणार आहे.
‘बिग बॉस मराठी 5’ टीमलाही खास निमंत्रण
सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’ मधील सर्व सदस्यांना विशेष आमंत्रण दिले आहे. या यादीत अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, अभिषेक करंगुटकर, आर्या जाधव, इरीना, अरबाज पटेल, निखिल दामले, वैभव चव्हाण, संग्राम चौगुले, घनश्याम दरडे, पुरुषोत्तम दादा पाटील आणि योगिता चव्हाण यांचा समावेश आहे.
सोहळ्याची थाटामाटात होणारी तयारी आणि व्हायरल पाहुण्यांची यादी पाहता, सूरज चव्हाणचे लग्न हे समाजमाध्यमांवर चर्चेचा प्रमुख विषय ठरले आहे.







