Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 25 June 2026, 15:44

पुणे: पुणे जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अपघातांचा सखोल अभ्यास करून तब्बल 121 धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) यादी तयार करण्यात आली असून, त्यामध्ये पुणे-सोलापूर महामार्ग सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. या महामार्गावर एकट्या 46 ब्लॅक स्पॉट्सची नोंद करण्यात आली आहे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी आता रस्ते सुरक्षा पथकातील अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. अपघातांची नेमकी कारणे शोधून तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना सुचविण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ‘वायुवेग पथकां’ना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जात असल्याने या मार्गांवर सातत्याने गंभीर अपघात घडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषांनुसार, सलग तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे 500 मीटर परिसरात किमान 5 गंभीर अपघात होऊन 10 किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेल्या ठिकाणाला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले जाते. अशा ठिकाणांवर विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

 

यासाठी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, एमएसआरडीसी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या कामासाठी आठ विशेष रस्ते सुरक्षा पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत समन्वय साधून काम करणार आहेत.

प्रशासनाने सर्व संबंधित पथकांना 25 जूनपर्यंत पाहणी पूर्ण करून स्वाक्षरीसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर 29 जून रोजी होणाऱ्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत या अहवालावर चर्चा करून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर निर्णय घेतला जाणार आहे.

महामार्गनिहाय ब्लॅक स्पॉट्सची संख्या:

* पुणे-सोलापूर महामार्ग – 46
* पुणे-अहिल्यानगर महामार्ग – 33
* पुणे-बेंगळुरू महामार्ग – 13
* पुणे-पंढरपूर (जेजुरी रस्ता) – 7
* इतर प्रमुख मार्ग – 22

या ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक सुधारणा, वाहतूक व्यवस्थापन, इशारा फलक, रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना राबवून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.