Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 June 2026, 16:11

बारामती, ता. २५ : शेअर मार्केटमध्ये दरमहा १० ते १५ टक्के हमखास परतावा, मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित आणि तीन वर्षांनंतर संपूर्ण गुंतवणूक परत मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे तसेच बिग बुल ट्रेडिंग कंपनी आणि बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स या संस्थांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कार्तिक नाळे, गौरव नाळे आणि संबंधित संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोहेल कुतुबुद्दीन इनामदार (वय ३२, रा. उत्कर्षनगर, जळोची, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून-जुलै २०२२ मध्ये मित्रामार्फत त्यांची कार्तिक नाळे याच्याशी ओळख झाली. त्यावेळी नाळे हा बिग बुल ट्रेडिंग कंपनी व बिग बुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्सच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडिंग, गुंतवणूक आणि आर्थिक परतावा यासंबंधी व्यवसाय करत असल्याचे सांगत होता. फिर्यादी इनामदार याने त्याच्या कार्यालयात जाऊन ट्रेडिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला. याच दरम्यान गौरव नाळे याचीही ओळख झाली. दोघांनी स्वतःला अनुभवी ट्रेडर, गुंतवणूक तज्ज्ञ आणि सेबी मान्यताप्राप्त असल्याचे भासवत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. कथित प्रमाणपत्रे, पोर्टफोलिओ, नफा-तोटा अहवाल आणि गुंतवणुकीचे दस्तऐवज दाखवून गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले.

 

आरोपींनी “तुमची मूळ रक्कम सुरक्षित राहील, तोटा झाला तरी तो आमचा असेल आणि दरमहा १० ते १५ टक्के परतावा मिळेल,” असे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादी सोहेल इनामदार यांनी विविध व्यवहारांद्वारे एकूण १० लाख रुपये गुंतविले. याच कालावधीत सागर जालिंदर जाधव (रा. डाळज नं. १, ता. इंदापूर) यांनाही आरोपींनी अशाच प्रकारे विश्वासात घेतले. त्यांनी रोख, UPI, NEFT आणि RTGS व्यवहारांद्वारे तब्बल ५५ लाख रुपये गुंतविल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, सागर जाधव यांनी दिलेल्या ४९ लाख रुपयांबाबत आरोपींनी २२ जुलै २०२५ रोजी नोटरीकृत करारनाम्यात रक्कम स्वीकारल्याचे लेखी मान्य केले होते. त्यात दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आणि मूळ रक्कम टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु, रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींनी सात लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश बँकेत सादर केल्यानंतर “Funds Insufficient” आणि “Negative Match with Money” या कारणांमुळे अनादरित झाला. त्यानंतर आरोपींनी कार्यालये बंद केली, मोबाईल फोन बंद ठेवले आणि संपर्क टाळण्यास सुरुवात केली.

आरोपींनी स्वतःला सेबी मान्यताप्राप्त ट्रेडर असल्याचे भासविले. मात्र कोणताही वैध SEBI Registration Number, Portfolio Manager Registration किंवा Investment Adviser Registration सादर केले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणात मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, बारामती यांनी फौजदारी विविध अर्ज क्रमांक ४३/२०२६ मध्ये दिलेल्या आदेशानुसार आरोपी कार्तिक नाळे, गौरव नाळे आणि संबंधित संस्थांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८, ३४० सह ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम (MPID Act) १९९९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींची बँक खाती, आर्थिक व्यवहार, मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक पुरावे, इतर ठेवीदारांची माहिती तसेच सेबी आणि आरबीआयकडील नोंदणीची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच BUDS Act आणि MPID Act अंतर्गत आवश्यक ती जप्ती व मालमत्ता गोठविण्याची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बारामतीसह परिसरातील अनेक गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.