Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो ‘MH 12’ पासिंगचा काळ संपला! पुणे RTO ची सर्वात मोठी घोषणा; आता रस्त्यावर दिसणार ‘या’ नवीन नंबरची वाहने

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 7:41

पुणे: ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणणाऱ्या पुणेकरांसाठी वाहनांच्या नंबरप्लेटवरील MH12 ही एक वेगळीच ओळख आहे. मात्र, आता पुणेकरांना वाहनांसाठी नवा आरटीओ कोड मिळणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनांसाठी MH61 ही नवीन मालिका सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात नोंदणी होणाऱ्या नवीन चारचाकी वाहनांना MH61 A 0001 या स्वरूपातील नंबर मिळणार आहेत.

पुणे आरटीओमधील MH12 मालिकेची उपलब्ध मालिका संपल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. MH12 ZZ पर्यंतची मालिका वापरली गेल्यानंतर त्यापुढे MH12 AAA अशा तीन अक्षरी मालिकेचा वापर करता येत नाही. वाहन नोंदणीच्या नियमांनुसार दोन अक्षरांनंतर तीन अक्षरे देण्याची पद्धत मान्य नसल्याने नवीन पर्याय शोधण्यात आला.

पुणेकरांची MH12 ही ओळख कायम ठेवण्यासाठी यापूर्वी MH12 1A असा पर्याय सुचवण्यात आला होता. यासाठी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही विनंती केली होती. मात्र, MH12 1A पेक्षा स्वतंत्र MH61 मालिका सुरू करणे अधिक सोपे असल्याने अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, नवीन मालिकेमुळे वाहन नोंदणीच्या पहिल्याच दिवशी आरटीओ कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पसंतीचा नंबर मिळवण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज येऊ शकतात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असून पसंतीच्या क्रमांकांसाठी लिलावही आयोजित केला जाणार आहे.

 

महाराष्ट्रात वाहनांची संख्या वाढत असल्याने विविध आरटीओ कार्यालयांना नवीन मालिका देण्यात येत आहेत. MH51 पासून MH60 पर्यंत रायगड, रत्नागिरी, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, सोलापूर आणि अहिल्यानगरमधील विविध उपविभागांना कोड देण्यात आले आहेत. आता MH61 हा नवा कोड पुण्याच्या वाट्याला आला आहे.

त्यामुळे पुणेकरांच्या वाहनांवर MH12 ही पारंपरिक ओळख कायम राहणार असली, तरी नव्या वाहनांसाठी MH61 ही नवी ओळख रस्त्यावर दिसणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post

पेपरफुटीचा आरोप, चाळणी परीक्षेत गैरप्रकार अन् शेवटी MPSC चा 'तो' पेपर रद्द; एमपीएससीचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp