Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, उद्यापासून भिडे पूल बंद! प्रवासाचे नियोजन बदलले, वाचा हे पर्यायी मार्ग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 22 June 2026, 16:20

पुणे: पुण्यातील डेक्कन मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी केबल ब्रिजच्या उभारणीचे काम सुरू झाल्यामुळे भिडे पुलावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर काही प्रमाणात परिणाम होणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 जूनच्या मध्यरात्रीपासून 6 जुलैपर्यंत भिडे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पुलावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. त्यानंतर 7 जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पुलावरील वाहतूक बंद राहणार आहे. दिवसा मात्र नागरिकांना पुलाचा वापर करता येणार आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. टिळक चौक, खंडोजी बाबा चौक, जयंतराव टिळक पूल, गंधर्व चौक, ओंकारेश्वर पूल आणि एस. एम. जोशी पूल या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुचाकीस्वारांसाठी झेड ब्रिज हा पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

 

दरम्यान, नवले पूल परिसरातील सेवा रस्त्यांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसराचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत झाल्यामुळे सेवा रस्त्यांच्या उभारणी आणि देखभालीची जबाबदारी आता महापालिकेकडे सोपवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक भूसंपादन, मोबदला वाटप आणि प्रशासकीय प्रक्रिया पालिकेमार्फत राबवण्यात येणार आहेत.

नवले पूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सेवा रस्त्यांचा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रियेला स्थानिकांचा विरोध असल्याने कामात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खासदार बजरंग बाप्पाच्या लेकावर खुनाचा आरोप? “हॉटेल मालक हत्या प्रकरणातील सूत्रधारावर गुन्हा दाखल करा” नातेवाईक आक्रमक

Tuesday, 23 June 2026, 19:09

‘पान में पान चखना हो तो मीठा, तुफान को नाचते हुए देखना हो तो ईठा…’ ईठाचा दमदार टीझर रिलीज; श्रद्धा कपूरची तुफान एंट्री चर्चेत

Tuesday, 23 June 2026, 18:32

बिरोबावाडी येथे विहिरीच्या पाण्यावरून सख्ख्या भावांमध्ये राडा; ऊस जळत असल्याचा जाब विचारताच काठीने मारहाण

Tuesday, 23 June 2026, 18:21

मद्यसाठा चोरीचा? तुळापूर पार्टीतील दारू डी मोरा क्लबची; नियमभंगामुळे क्लबवर कारवाईची टांगती तलवार

Tuesday, 23 June 2026, 17:44

पावसाळ्यातील सुदृढ आरोग्याचे रहस्य! तुमच्या ताटात असावी ही फळे आणि भाज्या; आजारांना म्हणा बाय-बाय!

Tuesday, 23 June 2026, 17:09

‘तु मला सोडून का गेला, तू असं का केलं?’ सियाची इंस्टाग्रामवरची भावनिक पोस्ट अन् व्हिडीओ व्हायरल; स्वतः खून केल्यानंतर रडारड, पहा व्हिडीओ…

Tuesday, 23 June 2026, 17:06
Next Post

उच्च न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली; हवेली तालुक्यात बंदी असतानाही फिरणाऱ्या शिंदवणे येथील आरोपीला बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.