Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पान में पान चखना हो तो मीठा, तुफान को नाचते हुए देखना हो तो ईठा…’ ईठाचा दमदार टीझर रिलीज; श्रद्धा कपूरची तुफान एंट्री चर्चेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 June 2026, 18:32

पुणे: अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाशी संबंधित काही दृश्ये सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता अधिकृत टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हा चित्रपट तमाशासम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची, कलेप्रती असलेल्या निष्ठेची आणि तमाशा क्षेत्रातील योगदानाची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

टीझरची सुरुवात तमाशाच्या रंगमंचावरील वातावरणाने होते. प्रेक्षकांमधून “ईठा कुठेय? ईठाला बोलवा” अशी हाक ऐकू येते. दुसरीकडे, प्रसूती वेदना सहन करत असतानाही ईठा रंगमंचावर जाण्याची तयारी करताना दिसते. मुलाला जन्म दिल्यानंतरही ती कार्यक्रमासाठी तयार होण्याचा निर्धार व्यक्त करते. त्यानंतर तिची रंगमंचावरील दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

 

टीझरमधील “पडून मेले तर लोक मला बेचारी म्हणतील, पण नाचता नाचता मेले तर आदर्श बनेन” हा संवाद विशेष चर्चेत आला आहे. श्रद्धा कपूरचा अभिनय, तिचे हावभाव आणि लावणी सादरीकरणाची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी श्रद्धा कपूरच्या या भूमिकेचे कौतुक केले असून हा तिच्या कारकिर्दीतील वेगळा आणि आव्हानात्मक सिनेमा ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, नाना पाटेकर आणि मोहम्मद जीशान अय्यूब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ईठा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असून सध्या त्याच्या टीझरची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“याआधीही सियाने केतनला दरीत ढकललं होतं” केतनच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले “तो एका झाडामुळे वाचला होता…”

Tuesday, 23 June 2026, 19:53

खासदार बजरंग बाप्पाच्या लेकावर खुनाचा आरोप? “हॉटेल मालक हत्या प्रकरणातील सूत्रधारावर गुन्हा दाखल करा” नातेवाईक आक्रमक

Tuesday, 23 June 2026, 19:09

‘पान में पान चखना हो तो मीठा, तुफान को नाचते हुए देखना हो तो ईठा…’ ईठाचा दमदार टीझर रिलीज; श्रद्धा कपूरची तुफान एंट्री चर्चेत

Tuesday, 23 June 2026, 18:32

बिरोबावाडी येथे विहिरीच्या पाण्यावरून सख्ख्या भावांमध्ये राडा; ऊस जळत असल्याचा जाब विचारताच काठीने मारहाण

Tuesday, 23 June 2026, 18:21

मद्यसाठा चोरीचा? तुळापूर पार्टीतील दारू डी मोरा क्लबची; नियमभंगामुळे क्लबवर कारवाईची टांगती तलवार

Tuesday, 23 June 2026, 17:44

पावसाळ्यातील सुदृढ आरोग्याचे रहस्य! तुमच्या ताटात असावी ही फळे आणि भाज्या; आजारांना म्हणा बाय-बाय!

Tuesday, 23 June 2026, 17:09
Next Post

खासदार बजरंग बाप्पाच्या लेकावर खुनाचा आरोप? "हॉटेल मालक हत्या प्रकरणातील सूत्रधारावर गुन्हा दाखल करा" नातेवाईक आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.