Pune News: लोणी काळभोर, ता. 11 : पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी काळभोर, लोणीकंद, व वाघोली भागात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने छापा कारवाई केली. (Pune Crime News)

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परिसरातील पांडवदंड रोड परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी बसवराज इरप्पा रामपुरे (वय 65), निलेश सुरेश फुलपगर (वय 34), सचिन बाबुराव काळभोर (मालक), रमेश वसंत बामणे (वय 57) आणि गणेश नारायण सोनवणे (वय 31) यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुनील रामधन राठोड वय 43, रा. बालाजी निसर्ग सोसायटी, शिरसवाडी, ता हवेली ( रायटर ) संजय विलास चांदणे (वय -28, रा. बोल्हाई माता मंदिर पाठीमागे, वाडेबोल्हाई, ता हवेली, खेळी) दगडू शिवराम वाघमारे (वय 51, रा. बालाजी निसर्ग सोसायटी, शिरसवाडी, ता हवेली, मालक) हे जुगार खेळत असताना मिळून आले आहेत. त्यांचे ताब्यात रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहीत्य असा एकुण 12 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार अड्ड्यांवरील कारवाईत शिरसवाडी येथील बालाजी निसर्ग सोसायटी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये सुनील रामधन राठोड (वय 43, रायटर), संजय विलास चांदणे (वय 28, खेळी) आणि दगडू शिवराम वाघमारे (वय 51, मालक) हे जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 12,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारूविरोधी कारवाईत आव्हाळवाडी (ता. हवेली) परिसरात सुरेखा दिनेश नानवत (वय 30, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली, पुणे) हिचे ताब्यातून 6 हजार 500 रुपयांची हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. तर वेंकटप्पा बिचप्पा गौड (वय 51, रा. जाधव वस्ती, केसनंद, ता. हवेली) याचे ताब्यातून7 हजार 500 रुपयांची 100 लीटर तयार ताडी जप्त करण्यात आली. तसेच मुकुंद रघुनाथ निकाळजे (वय 50, रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) याचे ताब्यात एकूण 4740 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेची विविध पथके कार्यरत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने लोणीकंद, वाघोली आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध भागांत अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर छापा कारवाई करत त्यांचा उच्छेद केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचे यूनिट 6 कडील पथकाने केलेली आहे.






