पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. पक्षाने कोणतीही अधिकृत यादी प्रसिद्ध न करता इच्छुकांना वैयक्तिकरित्या बोलावून फॉर्म दिले. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, माजी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट आणि माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या कन्या निवेदिता एकबोटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. याशिवाय भाजपने इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांवरही विश्वास दाखवला आहे.

भाजपच्या ४१ प्रभागांमधील प्रमुख उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
-
प्रभाग 1 कळस-धानोरी: राहुल भंडारे, संगीता दांगट, वंदना खांदवे, अनिल टिंगरे
-
प्रभाग 2 फुलेनगर-नागपूर चाळ: रेणुका उगले, सुधीर वाघमोडे, पूजा जाधव, राहुल जाधव
-
प्रभाग 3 विमाननगर-लोहगाव: श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, रामदास दाभाडे
-
प्रभाग 4 खराडी-वाघोली: शैलजित बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती भरणे, सुरेंद्र पठारे
-
प्रभाग 5 कल्याणीनगर-वडगाव शेरी: नारायण गलांडे, श्वेता गलांडे, कविता गलांडे, योगेश मुळीक
-
प्रभाग 6 येरवड-गांधीनगर: संतोष आरडे, ईशा विटकर, संगीता धुमाळ, संजय भोसले
-
प्रभाग 7 गोखलेनगर-वाकडेवाडी: नीशा मानवतकर, सायली माळवे, रेश्मा भोसले, हरीश निकम
-
प्रभाग 8 औंध-बोपोडी: परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, सनी निम्हण
-
प्रभाग 9 सूस-बाणेर-पाषाण: रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयूरी कोकाटे, लहू बालवडकर
-
प्रभाग 10 बावधन-भुसारी कॉलनी: किरण दगडे, रूपाली पवार, अर्पणा वरपे, दिलीप वेडेपाटील
-
प्रभाग 11 रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर: अजय मारणे, शर्मिल शिंदे, मनीषा बुटाला, अभिजित राऊत
-
प्रभाग 12 शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी: अमृता म्हेत्रे, अपूर्वा खाडे, पूजा जगडे, निवेदिता एकबोटे
-
प्रभाग 13 पुणे स्टेशन-जय जवाननगर: नीलेश आल्हाट, शोभा मेमाणे, अश्विनी भोसले, सोनू निकाळजे
-
प्रभाग 14 कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा: हिमाली कांबळे, किशोर धायरकर, मंगला मंत्री, उमेश गायकवाड
-
प्रभाग 15 मांजरी बुद्रुक-केशवनगर: नंदा आबनावे, महादेव कोंढरे, सारिका घुले, शिवराज घुले
-
प्रभाग 16 हडपसर-सातववाडी: शिल्पा होळे, उज्ज्वला जंगले, आबा तुपे, संदीप दळवी
-
प्रभाग 17 रामटेकडी-माळवाडी: खंडू लोंढे, शुभांगी होळे, पायल तुपे, प्रशांत तुपे
-
प्रभाग 18 वानवडी-साळुंखे विहार: धनराज घोगरे, कालिंदी पुंडे, कोमल शेंडकर, अभिजित शिवरकर
-
प्रभाग 19 कोंढवा खुर्द-कौसर बाग: नूर फातिमा हुसेन खान, सुप्रिया शिंदे, सतपाल पारघे, अमर गव्हाणे
-
प्रभाग 20 शंकर महाराज मठ-बिबवेवाडी: राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, महेंद्र सुंदेचा, तन्वी दिवेकर
-
प्रभाग 21 मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क: प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर, मनीषा चोरबोले, श्रीनाथ भिमाले
-
प्रभाग 22 काशेवाडी-डायस प्लॉट: मृणाल कांबळे, संदीप लडकत, अर्चना पाटील, विवेक यादव
-
प्रभाग 23 रविवार पेठ-नाना पेठ: पल्लवी जावळे, अनुराधा मंचरे, ऋतुजा गडाळे, विशाल धनवडे
-
प्रभाग 24 कसबा गणपती-के.नेहरू रुग्णालय: कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव, देवेंद्र वडके, गणेश बिडकर
-
प्रभाग 25 शनिवार पेठ-म.फुले मंडई: स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक
-
प्रभाग 26 घोरपडे पेठ-गुरुवार पेठ: विष्णू हरिहर, प्रज्ञा माळवदे, ऐश्वर्या थोरात, अजय खेडेकर
-
प्रभाग 27 नवी पेठ-पर्वती: अमर आवळे, स्मिती वस्ते, लता गौड, धीरज घाटे
-
प्रभाग 28 जनता वसाहत-हिंगणे खुर्द: वृषाली रिठे, मनीषा बोडके, विनया बहुलीकर, प्रसन्न जगताप
-
प्रभाग 29 डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी: सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, पुनीत जोशी
-
प्रभाग 30 कर्वेनगर-हिंगणे-होम कॉलनी: सुशील मंगडे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, राजाभाऊ बराटे
-
प्रभाग 31 मयूर कॉलनी-कोथरूड: दिनेश माथवड, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, पृथ्वीराज सुतार
-
प्रभाग 32 वारजे-पॉप्युलरनगर: हर्षदा भोसले, सायली वांजळे, भारतभूषण बराटे, सचिन दोडके
-
प्रभाग 33 शिवणे-खडकवासला: धनश्री कोल्हे, ममता दांगट, सुभाष नाणेकर, किशोर पोकळे
-
प्रभाग 34 नऱ्हे-वडगाव बुद्रुक: हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भूमकर, राजाभाऊ लायगुडे
-
प्रभाग 35 सनसिटी-माणिकबाग: ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, सचिन मोरे, श्रीकांत जगताप
-
प्रभाग 36 सहकारनगर-पद्मावती: वीणा घोष, शैलजा भोसले, सई थोपटे, महेश वाबळे
-
प्रभाग 37 धनकवडी-कात्रज डेअरी: बाळा धनकवडे, वर्षा तापकीर, तेजश्री बदक, अरुण राजवाडे
-
प्रभाग 38 बालाजीनगर-आंबेगाव: अश्विनी चिंदे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोरघे
-
प्रभाग 39 अप्पर सुपर-इंदिरानगर: वर्षा साठे, दिंबर धवरी, रूपाली धाडवे, बाळा ओसवाल
-
प्रभाग 40 कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी: अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम, रंजना टिळेकर
-
प्रभाग 41 महंमदवाडी-उंड्री: प्राची आल्हाट, जीवन जाधव, स्नेहल दगडे, अतुल तरवडे
भाजपच्या या निर्णयामुळे पक्षात काही प्रमाणात नाराजीही पाहायला मिळाली. तिकीट नाकारल्यामुळे माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्याच्या ४१ प्रभागांमध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, भाजपने घराणेशाही आणि नवीन चेहरे यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पुणेकर कोणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






