Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: स्वतःची किडनी देऊन मुलाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं; ससूनमधील ‘ती’ घटना वाचून डोळे पाणावतील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 December 2025, 11:49

Pune News: पुणे : आईच्या मायेला तोड नाही! जेव्हा विज्ञानाला मर्यादा येतात, तेव्हा एका आईची जिद्द चमत्कार घडवते. पुण्याच्या ससून रुग्णालयातील ही किडनी ट्रान्सप्लांटची कथा केवळ शस्त्रक्रिया (Surgery) नाही, तर एका आईने मृत्यूवर मिळवलेला विजय आहे. (Kidney transplant)

 

पुण्यातील ससून रुग्णालयाने एका गरजू कुटुंबाला आधार देत मातृत्वाच्या निस्वार्थ प्रेमाची साक्ष दिली आहे. एका 22 वर्षीय तरुणाला नवजीवन देण्यासाठी त्याच्या आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करून त्याला जणू दुसरा जन्म दिला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना आणि खाजगी रुग्णालयातील मोठा खर्च परवडणारा नसताना ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी या माय-लेकाला मोलाची साथ दिली.

पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला उच्च रक्तदाबामुळे दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झाले होते. गेल्या वर्षभरापासून त्याच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. मात्र प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. मुलाचे वडील साफसफाईचे काम करून दरमहा सुमारे 13 हजार रुपये कमावतात. खासगी रुग्णालयांनी सांगितलेला सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता.

अशा कठीण परिस्थितीत मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आईने कोणताही विचार न करता स्वतःचे मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. ससून रुग्णालयातील समाजसेवा विभाग आणि मूत्रपिंड तज्ज्ञांनी या कुटुंबाला वैद्यकीय उपचारांसोबतच कायदेशीर आणि आर्थिक मार्गदर्शन केले. विविध शासकीय योजना आणि मदत संस्थांच्या सहकार्यामुळे उपचारांचा सर्व खर्च शून्यावर आणण्यात आला.

आई आणि मुलाच्या सर्व वैद्यकीय तपासण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर 27 डिसेंबर रोजी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आईकडून दिलेले मूत्रपिंड योग्यरीत्या कार्यरत असून शस्त्रक्रियेनंतर माय-लेक दोघेही सुखरूप आहेत.

ससून रुग्णालयातील ही 35 वी यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मातृत्वाची ताकद आणि शासकीय रुग्णालयातील योग्य वैद्यकीय सेवा मिळाल्यास कोणतेही संकट दूर करता येते, हे स्पष्ट झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

Loni Kalbhor News: दावणीला बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला; लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.