Pune News : पुणे : दुबईहून स्पाईसजेट विमानाने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाने २० लाख रुपये किमतीची सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) हा माल जप्त केला आहे. शनिवारी (ता. ०१) हि घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
मिळालेल्या महितीनुसार, सदर महिला हि शनिवारी (ता. १) एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-५२ या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिने तिच्या शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आला.
दरम्यान, कस्टम अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. कस्टम विभागाकडून२० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. Pune News