पुणे : पुण्यातुन गौरव अहुजा प्रकरणी अपडेट समोर आली आहे. येरवाडा परिसरात भररस्त्यात अलिशान कार थांबवून दारूच्या नशेत लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
गौरव अहुजा 7 मार्च रोजी पुण्यात वाघोली परिसरामध्ये बीएमडब्ल्यू कारने जात असताना, या तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्यात गाडी थांबवून रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवार 9 मार्च रोजी व्हायरल झाला होता. त्यानंतर, सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत अटक केली होती. त्यानंतर आता 17 दिवसांनी गौरव आहुजाला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.