Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: प्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामे अडचणीत! पीएमपी प्रशासनाकडून नोटीस; ‘ती’ रील पडली महागात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 2 January 2026, 19:19
Pune News: Famous reel star Atharva Sudame in trouble! Notice from PMP administration; 'That' reel has become expensive

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसमध्ये (Pune News) विनापरवानगी चित्रीकरण करून सोशल मीडियावर रील प्रसारित केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामे (Atharwa Sudame) याला नोटीस बजावली आहे.अथर्व सुदामे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून, त्याच्या इन्स्टाग्रामवरील रील्सना लाखो लोक पाहतात. मात्र, पीएमपीएमएलच्या बसमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याने हा प्रकार वादात सापडला आहे. (Breaking News)

पीएमपीएमएलकडून जारी करण्यात आलेल्या नोटीस नुसार, संबंधित रीलमध्ये महामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते. या दरम्यान महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशीन तसेच बॅच-बिल्ला यांचा वापर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हे चित्रीकरण थेट इन्स्टाग्रामवर अपलोड करून प्रसारित करण्यात आले होते.

 

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या रीलमध्ये महिला प्रवाशांचे अवमान करणारे आणि अपमानास्पद चित्रण दिसून येत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचा ठपका पीएमपीएमएलने ठेवला आहे. तसेच अशा प्रकारच्या कृतीमुळे सार्वजनिक बससेवेवरील विश्वासाला धक्का बसत असून, महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने संबंधित रील तात्काळ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात महामंडळाच्या सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा रील प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, मुदतीत खुलासा न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Crime News

Crime News : भाजप उमेदवारांच्या वादात मनसे नेत्याचा बळी; भरदिवसा झालेल्या हत्येने शहरात तणाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.