Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : भाजप उमेदवारांच्या वादात मनसे नेत्याचा बळी; भरदिवसा झालेल्या हत्येने शहरात तणाव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 January 2026, 19:24
Crime News

photo- social media

Crime News : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या गडबडीत राजकीय वाद चिघळला आणि त्यातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुण हा मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये घडली. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. राजकीय वादातूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २ मध्ये आज अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या दोन गटांत जोरदार वाद झाला होता. या प्रभागातून शालन शिंदे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्याच बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दबाव टाकला जात होता. याच मुद्द्यावरून शिंदे गट आणि सरवदे गटात वाद इतका वाढला की भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालयही फोडण्यात आलं.

याच वादात मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरवदे तिथे गेले होते, असं सांगितलं जातं. मात्र त्या वेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही बातमी कळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली.

दरम्यान, या प्रभागातून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण पॅनल बिनविरोध व्हावा, यासाठी भाजपकडून मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच सरवदे कुटुंबावरही दबाव होता, असं म्हटलं जात आहे.

समाजात वाद वाढू नये म्हणूनच बाळासाहेब सरवदे मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. मात्र त्याच वेळी शिंदे गटाच्या लोकांनी त्यांची हत्या केली, असा गंभीर आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. (crime news)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Adv. C.R. Sanglikar arrested in Rs 27 crore land scam; Pimpri-Chinchwad police take major action in Miraj

27 कोटींच्या जमीन घोटाळ्यात ॲड. सी.आर. सांगलीकर गजाआड; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मिरजमध्ये मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.