Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: आरोग्य शिक्षण आणि संशोधनात नवीन पर्वाचा प्रारंभ; एमआयटी-एडीटी विद्यापीठ आणि अपोलो यांच्यात सामंजस्य करार

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 December 2025, 16:54
Pune News: A new era in health education and research begins; MoU between MIT-ADT University and Apollo

पुणे: आरोग्य शिक्षण आणि (Pune News) संशोधनामध्ये एक नवीन अध्याय सुरू करण्याच्या उद्देशाने, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, अपोलो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड, चेन्नई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून या द्वारे एमआयटी-एडीटी विद्यापीठामध्ये प्रस्तावित ‘अलाईड हेल्थ’ (संलग्न आरोग्य विज्ञान) अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि प्र-कुलपती प्रा.डॉ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., अपोलो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसचे सीबीओ आशिष शर्मा, प्र-कुलगुरू मोहित दुबे (संशोधन आणि उद्योजकता), प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी (तंत्रज्ञान विभाग), कुलसचिव डॉ. महेश चोपडे, प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

एमआयटी-एडीटी विद्यापीठास ‘अ’ श्रेणीचे नॅक (नॅक) मानांकन मिळाल्यानंतर, आता तंत्रज्ञान शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्याची संधी विद्यापीठासमोर आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठासाठी आरोग्य शिक्षण आणि संशोधनाची नवीन दारे उघडली गेली असून विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्याच्या आणि त्यानतंर रोजगाराचा नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे आशावाद प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे ‘अलाईड हेल्थ’ (संलग्न आरोग्य विज्ञान) क्षेत्रातील व्यावसायिकांची असलेली मोठी कमतरता भरून काढण्यास मदत होईल,असेही त्यांनी नमूद केले. कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी त्यांच्या प्रास्ताविकामधून उपरोक्त उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.

 

या वेळी बोलताना, अपोलोचे सीबीओ आशिष शर्मा यांनी अपोलो समूहा बद्दल माहिती दिली.अपोलो समूह आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असून अपोलो एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस द्वारे आरोग्य क्षेत्रातील जागतिक गरजा लक्षात घेऊन आपले अभ्यासक्रम तयार केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाशी (एनईपी) सुसंगत असलेले आरोग्य विज्ञानातील पदवी (बी.एससी), पदव्युत्तर (ए.एससी) आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम या भागीदारीतून उपलब्ध होतील. तसेच, अपोलो कडे असलेला गेल्या 40 वर्षांचा आरोग्य क्षेत्रातील डेटा आणि सिम्युलेशन कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी घेता येणार असल्याचे ते म्हणाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“घरात अर्धा हिस्सा पाहिजे!” सख्ख्या भावाचा संताप अनावर, नारायणगावात 62 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात मारला दगड

Monday, 19 October 2026, 12:15

लोणी काळभोरच्या ‘चटपटा जंक्शन’ मालकाच्या घरी घरफोडी; 21 लाखांचे सोने लंपास

Monday, 19 October 2026, 11:14

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस ‘अलर्ट’ मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 19 October 2026, 10:29

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04
Next Post

Talegaon Election: तळेगावात 'महायुती'चा धमाका, संतोष दाभाडे नवे नगराध्यक्ष, विरोधकांना धोबीपछाड देत सत्ता हाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp