Pune Crime: पुणे शहारातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फुरसुंगी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फुरसुंगी परिसरातील एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा गैरफायदा घेत आरोपीने तीच्याकडून पैसे लुबाडल्याची घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे आरोपीने पीडित मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगीची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण झाली. त्यानंतर मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्या सोबत लग्न करण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. पीडित मुलीला भेटण्यासाठी घरी बोलावून घेतले आणि तीची जवळीक साधली. याचवेळी नराधमाने पीडितेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले. काही दिवसानंतर आरोपींने पीडितेकडून पैशांची मागणी केली.
तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिते तीच्याकडून 1 लाख 15 हजार रुपये उकळले. हा प्रकार अनेक दिवस तसाच चालू राहिला. मात्र, अनेकदा नकार देऊनही त्याने पीडितेला मानसिक छळ देण्यास सुरु केला. संधी साधून नराधमाने पीडित तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून, तसंच तिच्या भावाच्या फेसबुक अकाउंटवरून खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल
हा सर्व प्रकार तरुणीच्या कुटुंबियांना समजताच, घरच्यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेतली. फुरसुंगी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी दिनेश राठोड (वय वर्ष 24) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुध्दात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि खासगी फोटो प्रसार माध्यमांत प्रसारित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आवाहन केले. तरुणांना आणि पालकांना सावधगिरा बाळगण्यास सांगितले.







