Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तक्रार मागे घे नाहीतर तुला लोणी काळभोरमध्ये फिरू देणार नाही…”, टेलरवर जीवघेणा हल्ला; दोन भावांवर गुन्हा दाखल!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 April 2026, 10:50
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Pune Crime : लोणी काळभोर, ता. 18 : पूर्वी केलेली तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याच्या रागातून एका टेलरवर भरदिवसा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खोकलाई मंदिराजवळ शुक्रवारी (ता. 17) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शरद अच्युत कदम (वय 36) आणि राहुल अच्युत कदम (वय 33, दोघेही रा. बाजारमळा, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलास रोहिदास जाधव (वय 44) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास जाधव हे टेलरिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

जाधव हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दुकानात काम करत होते. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ते जेवणासाठी घरी गेले. जेवण आटोपल्यानंतर त्यांच्या मुलाची चप्पल तुटल्याने ती शिवून घेण्यासाठी ते दत्त मंदिर परिसराकडे जात होते. याच वेळी खोकलाई मंदिराजवळ अचानक चारचाकी गाडीतून आलेल्या शरद कदम आणि राहुल कदम यांनी जाधव यांचा रस्ता अडवला. गाडीची काच खाली करून त्यांनी जाधव यांना दमदाटी करत, “तू आमच्याविरोधात दिलेली तक्रार लगेच मागे घे, नाहीतर तुला आणि तुझ्या मुलांना लोणी काळभोरमध्ये फिरू देणार नाही,” अशी उघड धमकी दिली.

जाधव यांनी शांतपणे “मी कायदेशीर तक्रार केली आहे, पुढे जे होईल ते कायद्यानुसार होईल,” असे सांगताच आरोपी संतापले. त्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी जाधव यांना गच्च पकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दंड, पाठ आणि हातावर वारंवार प्रहार करत त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली. “तुला खूप मस्ती आली आहे,” असे म्हणत आरोपींनी धमकावत हल्ला सुरूच ठेवला.

या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, जाधव यांचा पुतण्या सागर राजाभाऊ जाधव हा घटनास्थळी पोहोचला आणि त्याने हस्तक्षेप करत जाधव यांची सुटका केली. त्यानंतर आरोपी दोघेही तेथून पसार झाले. या घटनेनंतर जखमी अवस्थेत जाधव यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. या प्रकरणी शरद कदम आणि राहुल कदम या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

Wednesday, 29 April 2026, 13:28

Hadapsar News : क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी तरुणाला दांडक्याने मारहाण ; पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तिघांवर खंडणीचा गुन्हा, तर एजंटांची होणार ‘चारित्र्य पडताळणी’..

Wednesday, 29 April 2026, 12:56

Daund Politics: नांदूरच्या सरपंचपदी विशाल थोरात विराजमान, रुपाली चाकणकर यांच्या भावाला पराभवाचा धक्का

Wednesday, 29 April 2026, 12:23

Ambedkar jayanti : लोणी काळभोरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची पर्वणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Wednesday, 29 April 2026, 11:28
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : पुणे–सोलापूर महामार्गावर ‘रोड रेज’चा थरार! अपघातानंतर चालकाला बेदम मारहाण; अज्ञात आरोपी फरार, गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.