Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : पुणे–सोलापूर महामार्गावर ‘रोड रेज’चा थरार! अपघातानंतर चालकाला बेदम मारहाण; अज्ञात आरोपी फरार, गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 April 2026, 10:57
Loni kalbhor

photo- social media

Loni kalbhor : पुणे–सोलापूर महामार्गावर ‘रोड रेज’चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, किरकोळ अपघातानंतर चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एसबीआय बँकेसमोरील दुभाजकाजवळ शुक्रवारी (ता.17) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चालक आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, महामार्गावरील वाढत्या बेजबाबदार वाहनचालकांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हनुमंत खंडाळे (वय 31, रा. जिरेगाव, ता. दौंड) हे चालक असून, खराडी येथील समातर फाउंडेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या कुटुंबासह जिरेगाव येथे वास्तव्यास असून, नोकरी आणि वाहन व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खंडाळे हे खराडी येथील दिवसभराचे काम पूर्ण करूनरात्री सुमारे 8.45 वाजता आपल्या कारने (MH 42 AX 8764, हुंडाई वेन्यू) जिरेगावकडे निघाले होते.

पुणे–सोलापूर रोडवरून प्रवास करत असताना कदमवाक वस्ती परिसरातील एसबीआय बँकेसमोरील दुभाजकाजवळ निळ्या रंगाच्या टाटा टियागो (MH 12 WE 1548) कार चालकाने कोणतीही खबरदारी न घेता बेदरकारपणे वाहन चालवले. यामुळे खंडाळे यांच्या कारच्या ड्रायव्हर साईडला जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या कारच्या दरवाजाचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर खंडाळे यांनी तात्काळ आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. मात्र, समोरील वाहन चालक आणि त्याच्यासोबत असलेला अज्ञात इसम यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी खंडाळे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि काही क्षणांतच परिस्थिती चिघळली. दोघांनीही खंडाळे यांना हाताने चापट मारत बेदम मारहाण केली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतूक आणि परिसरात तणाव निर्माण झाला.

या घटनेदरम्यान खंडाळे यांनी धाडसाने ‘112’ आपत्कालीन नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथे फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्याचे लक्षात येताच आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर खंडाळे यांनी थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 281 , 324(4) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुणे–सोलापूर महामार्गावरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ‘रोड रेज’च्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी, अशीही मागणी होत आहे. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

“प्रेमसंबंधाच्या संशयातून थरारक खून!” – 6 तासांत आरोपी जेरबंद; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.