Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सोरतापवाडीत दुचाकी चोरांचा धुमाकूळ; घरासमोरून तीन मोटारसायकली लंपास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 11:08

Pune Crime : उरुळी कांचन, ता. 02 : सोरतापवाडी परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांत तीन मोटारसायकली लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणकरमळा परिसरात गुरुवारी (ता. 26) मध्यरात्री घरासमोर उभ्या असलेल्या एकाच मालकाच्या 55 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. यापूर्वी सोमवारी (ता. 23) सोरतापवाडी हद्दीतील चिंतामणी पार्क परिसरातून 70 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली होती.

 

याप्रकरणी विश्वनाथ रामचंद्र आढाळगे (वय 50, व्यवसाय – मजुरी, रा. लोणकरमळा, सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्या दोन मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. तसेच विठ्ठल अभिमान कांबळे (रा. चिंतामणी पार्क, सोरतापवाडी, ता. हवेली) यांची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आढाळगे यांनी दोन मोटारसायकली खरेदी केल्या होत्या. त्यापैकी एक मोटारसायकल ते स्वतः वापरत होते, तर दुसरी त्यांचा मुलगा वापरत होता. बुधवारी (ता. 25) रात्री सुमारे 9 वाजता दोन्ही मोटारसायकली घरासमोर पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या वेळी गाड्यांना लॉक करण्यात आले नव्हते.

रात्री कुटुंबीय जेवण करून झोपले. मात्र मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलगा आकाश याने वडिलांना उठवून दोन्ही मोटारसायकली गायब झाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला; मात्र काहीच मागमूस लागला नाही.

तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी 20 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची HF Deluxe (क्रमांक MH 12 MU 6341) आणि 35 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची Passion Pro (क्रमांक MH 12 RU 1154) अशा एकूण 55 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली चोरून नेल्या आहेत.

दरम्यान, विठ्ठल कांबळे यांनी MH 12 WS 8817 क्रमांकाची दुचाकी घरासमोर हँडल लॉक करून पार्क केली होती. सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर आले असता दुचाकी जागेवर दिसली नाही. आजूबाजूला शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking : जायकवाडी भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, प्रशासनात खळबळ

Thursday, 7 May 2026, 17:08

Ambegav News : विवाहित मुलीचे थरारक अपहरण; जबरदस्तीने दुसरे लग्न लावण्याचा डाव उधळला, पोलिसांची ४ तासांत धडाकेबाज कारवाई

Thursday, 7 May 2026, 16:54
Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; आरोपींची उच्च न्यायालयात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

Thursday, 7 May 2026, 16:40

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Next Post

तूर्तास निवडणुका नाहीच! रखडलेल्या 19 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा 'ब्रेक'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.