Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सैराटची पुनरावृत्ती! बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 7 November 2026, 11:11

नाशिक : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका 18 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे घडली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 20 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव आर्यन सोमनाथ कांबळे (वय 18) असे आहे. तर आदित्य एकनाथ मोंढे (वय 20, रा. शिरसगाव, त्र्यंबकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर शहरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आदित्यने आर्यनला भेटण्यासाठी या ठिकाणी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

वादातून चाकूने हल्ला

भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित आरोपीने आर्यनवर धारदार चाकूने हल्ला केला. त्याच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर आणि हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर आर्यनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी मृत आर्यनचे नातेवाईक रोशन पप्पू कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आदित्य मोंढे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या हत्येमागे नेमके कोणते कारण होते, याचा अधिक तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

Saturday, 7 November 2026, 12:17

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34

खड्डे, अपुरे सूचना फलक अन् वाहतूक कोंडी! पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Saturday, 7 November 2026, 11:21

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

Saturday, 7 November 2026, 11:15

सैराटची पुनरावृत्ती! बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची हत्या

Saturday, 7 November 2026, 11:11
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp