Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: डिजिटल लॉक असूनही पुण्यात चोरी! दूधवाल्याने चोरला दरवाजाचा पासवर्ड आणि लंपास केले 1.31 लाख

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 January 2026, 14:16

Pune Crime: पुणे (विमाननगर): पुण्यातील हायप्रोफाईल विमाननगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून घराचे संरक्षण करण्यासाठी बसवलेले ‘डिजिटल लॉक’ सुरक्षित असल्याचे मानले जाते, मात्र एका दूध पुरवठादाराने या लॉकचा पासवर्ड चोरून घरातून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश वसंत कारंडे (वय 34, रा. वडगावशेरी) असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून विमाननगर परिसरातील एका निवासी सोसायटीत दूध पुरवठा करत होता. न्यू एअरपोर्ट रोडवरील एमिनेन्स बाय नायकनवरे या निवासी संकुलातील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये 17 जानेवारी रोजी ही चोरी घडली.

तक्रारदार सूर्यनारायण राजारतीलम (वय 48) हे विमाननगर परिसरात रामेश्वरम नावाचे कॅफे चालवतात. ते आपल्या कुटुंबासह सदर फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. रोजच्या दिनक्रमानुसार राजारतीलम सकाळी 5 वाजता कॅफेवर गेले होते. सकाळी सुमारे 7 वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरातील कपाट तपासले असता त्यामधील 1,32,550 रुपये गायब असल्याचे लक्षात आले. त्या वेळी घरातील इतर सदस्य झोपेत होते आणि चोरी झाल्याची कोणालाही कल्पना नव्हती.

फ्लॅटला पासवर्डवर चालणारे डिजिटल डोअर लॉक बसवण्यात आले होते. आरोपीने अनेक वेळा पासवर्डचा अंदाज घेऊन दरवाजा उघडल्याचे तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ओळखून अटक केली असून, चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

या प्रकरणी विमाननगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. डिजिटल लॉक असले तरीही सुरक्षिततेबाबत नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28
Next Post
Pune Crime: 'Come meet me, let's go on a date' incident of youth in Pune; He was lured into the trap by saying he was 'gay' on a dating site, invited him to meet him and...

Pune Crime: 'मला भेटायला ये आपण डेटवर जाऊ' पुण्यात तरुणांचं कांड; डेटिंग साईटवर 'गे' असल्याचं सांगून जाळ्यात ओढलं, भेटायला बोलावलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp