Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : कुंजीरवाडी येथील यात्रेत कोयत्याचा थरार! तरुणावर जीवघेणा हल्ला; दोन आरोपींना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 13:13
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Pune Crime : लोणी काळभोर, ता. 28 : पिरसाहेबांच्या उरूस यात्रेत भर चौकात कोयता काढून तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. 25) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादाच्या रागातून हा हल्ला झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

 

प्रविण राजाभाऊ घोडके (वय 21, रा. मगरवस्ती, म्हतोबाची आळंदी रोड, म्हतोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) आणि ऋषीकेश नाना लोंढे (रा. 12 फाटा चौकी, जयगणेश पार्क, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) तसेच त्यांच्या इतर दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव सुदर्शन खलसे (वय 24, रा. माळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव खलसे हा त्याचा मित्र आदेश बरडे याच्यासोबत यात्रेत गेला होता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघे घरी परतत असताना बाजार मैदान परिसरात काही तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून प्रविण घोडके याने कमरेला लपवलेला लोखंडी कोयता बाहेर काढून थेट गौरववर हल्ला केला.

कोयत्याच्या पाठीमागील बोथट बाजूने उजव्या हातावर आणि पाठीवर वार करून गौरव खलसे यांना जखमी करण्यात आले. त्याच वेळी ऋषीकेश लोंढे व इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे यात्रेतील वातावरण तणावपूर्ण झाले.

गौरव आणि त्याचा मित्र कसाबसा सुटून घरी पळाले. मात्र, जुन्या कॅनॉल पुलावर नागरिकांची गर्दी जमल्याचे पाहून ते पुन्हा घटनास्थळी गेले. हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या आरोपींना पाहून संतप्त नागरिकांनी त्यांना जाब विचारला. आरोपींनी लोकांनाही शिवीगाळ केल्याने काही नागरिकांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रविण घोडके आणि ऋषीकेश लोंढे यांना ताब्यात घेतले, तर त्यांच्या दोन साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 115(1), 3(5), 351(2), 351(3), 352 तसेच शस्त्र अधिनियम 25(4) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), (2), (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेसारख्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात उघडपणे कोयता घेऊन तरुणावर हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

Navi Mumbai Airport to Thane Flyover: ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता सुसाट! तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणं विसरा; पाहा काय आहे सरकारचा 'मास्टर प्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.