Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ६० हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा मोठा मास्टरप्लॅन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 August 2026, 17:04

पुणे: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार पाहता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची गरज आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मुंबई-पुणे महामार्ग बांधताना भविष्यात पुणे एवढ्या वेगाने वाढेल, याचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्यावेळी केलेले रस्ते नियोजन आजच्या वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत अपुरे ठरत असल्याची कबुली त्यांनी दिली.

लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ कार्यक्रमात गडकरी बोलत होते. पुण्यात प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्या असतानाही शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे आता जवळपास ‘हाऊसफुल’ झाले असून, तात्पुरत्या उपायांपेक्षा पुढील अनेक वर्षांचा विचार करून रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले की, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे महामार्गासाठी सुरुवातीला चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव होता. मात्र, भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन त्यांनी सहापदरी रस्त्याचा आग्रह धरला. तरीही आज हा मार्गही अपुरा पडत आहे. त्यामुळे रस्ते, पूल, बोगदे आणि इतर दळणवळणाच्या सुविधा उभारताना किमान पुढील ५० वर्षांचा विचार करणे गरजेचे आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि खेड-नाशिक फाटा या मार्गांवर विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. पुणे-संभाजीनगर मार्ग सहापदरी करण्याचे कामही सुरू आहे. या सर्व रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी पुढील काळात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06
Next Post

उरुळी कांचन दरोडा-खून प्रकरणातील सोन्याचे दागिने अखेर 23 वर्षांनंतर महिलेच्या ताब्यात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp