Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वानवडीतील ‘स्काय स्पा’ मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 July 2026, 18:49

पुणे, ता. ६ : वानवडी परिसरातील परमार गॅलरी येथील ‘स्काय स्पा’ या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकत ४ जुलै रोजी या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत स्पा सेंटरचा मालक आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच रोकड, डीव्हीआर, रेट कार्ड, कंडोम, नोंदींची वही आणि अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

व्यवस्थापिका रुबीका ऊर्फ लालरेम्पपुई थाँगलियाना (वय ३३, मूळ रा. मिझोराम, सध्या कोंढवा) आणि स्पा मालक गोविंद रामचंद्र धारवल (वय २६, रा. गोसावी वस्ती, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप आनंदा साळवे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिसांना ‘स्काय स्पा’ येथे मसाजच्या नावाखाली परराज्यातील महिलांकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी प्रथम एक बनावट ग्राहक स्पा सेंटरमध्ये पाठवून माहितीची खातरजमा केली. संबंधित ठिकाणी मसाजबरोबर लैंगिक संबंधासाठी पैशांची मागणी होत असल्याची खात्री होताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. छाप्यात स्पा सेंटरमधील विविध खोल्यांमध्ये ग्राहकांसोबत तीन महिला आढळून आल्या.

चौकशीत स्पा सेंटरची व्यवस्थापिका रुबीका ऊर्फ लालरेम्पपुई थाँगलियाना आणि स्पा मालक गोविंद रामचंद्र धारवल हे ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांकडून देहविक्री करून घेत असल्याचे उघड झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संबंधित महिलांनीही त्यांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात आणल्याचे पोलिसांसमोर सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी स्पा सेंटरमधून २,४०० रुपयांची रोकड, डीव्हीआर, रेट कार्ड, नोंदींची वही, मसाज ऑइल, कंडोमची पाकिटे, बेडशीटसह विविध साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या वहीत ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, व्यवहाराच्या नोंदी आणि आर्थिक देवाणघेवाणीची माहिती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

यावेळी स्पा सेंटरमध्ये काम करणारा कार्यालयीन कर्मचारीही पोलिसांच्या हाती लागला. त्यानेदेखील ग्राहकांकडून पैसे घेऊन मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी स्पा मालक गोविंद रामचंद्र धारवल आणि व्यवस्थापिका रुबीका ऊर्फ लालरेम्पपुई थाँगलियाना यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ मधील कलम ३, ४ व ५ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27
Next Post

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.