Sunday, July 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई! पानात मिसळून दिली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त; आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 20:15

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिरूर तालुक्यातील केंदूर (पऱ्हाडमळा) येथे छापा टाकून पानामध्ये मिसळून विक्रीसाठी ठेवलेली संशयित अपायकारक पावडर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक, दोन पंच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह केंदूर येथील पहाडमळा परिसरात छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान तुषार राहुल पऱ्हाड (वय २६, रा. पऱ्हाडमळा, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या घरामागील पत्राशेडची झडती घेतली असता, लाल रंगाच्या टेबलावरील बॉक्समध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेली उग्र वासाची संशयित पावडर आढळून आली. प्राथमिक माहितीनुसार, ही पावडर पानामध्ये मिसळून व्यसनासाठी ग्राहकांना दिली जात होती.

 

फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळीच पावडरची प्राथमिक तपासणी केली. पंचांसमक्ष संशयित माल जप्त करण्यात आला. त्यातील प्रत्येकी १० ग्रॅमचे दोन नमुने रासायनिक विश्लेषणासाठी स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आले, तर उर्वरित ८५ ग्रॅम पावडर नियमानुसार जप्त करून तपासासाठी पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणी तुषार राहुल पहाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सोमनाथ कचरे, धनंजय थेऊरकर आणि विशाल देशमुख यांच्या पथकाने केली.

खायचे पानामधून व्यसन करणे या मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध प्रकारची माहिती मिळताच तातडीने धडक कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अशी माहिती पोलिसांना निर्भयपणे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
~चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देवकुंड धबधब्यात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sunday, 12 July 2026, 21:54

दारू पिताना झालेला वाद ठरला जीवघेणा! सिमेंटचा ठोकळा मारून तरुणाची हत्या; फूल विक्रेत्याला अटक

Sunday, 12 July 2026, 21:18

वारी सुलभ होणार! गाव ते पंढरपूर थेट एसटी बस सेवा; ५,५०० विशेष बसेसचे नियोजन

Sunday, 12 July 2026, 20:39

भोर एमआयडीसीच्या विकासाला वेग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Sunday, 12 July 2026, 19:58

बोरीऐंदी येथे शेतात काम करताना ट्रॅक्टर पलटी; 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Sunday, 12 July 2026, 19:24

उरुळी कांचनमध्ये ‘आरोग्यवारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 230 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, 14 महिलांची मॅमोग्राफी, समर्थ युवा फाउंडेशनचा उपक्रम..

Sunday, 12 July 2026, 19:10
Next Post

लोणी काळभोरमध्ये भरधाव स्विफ्टची पोलोला पाठीमागून जोरदार धडक; वादानंतर चालकासह सहप्रवाशाविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.