Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये भरधाव स्विफ्टची पोलोला पाठीमागून जोरदार धडक; वादानंतर चालकासह सहप्रवाशाविरुद्ध गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 July 2026, 20:37

लोणी काळभोर, ता. ११ : पुणे-सोलापूर महामार्गावर पुढील वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने पोलो कारचालकाने वेळेत वाहन नियंत्रित केले. मात्र, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने अंतर न राखता जोरदार धडक दिल्याने पोलो कारचे मोठे नुकसान झाले. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीती माळी मळा परिसरातशुक्रवारी (ता. १०) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर सहप्रवाशाने कारचालकाला शिवीगाळ केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चालक व सहप्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्र्यंबक शिवाजी काळे (वय ३८, रा. देलवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) व सहप्रवासी बाळासाहेब भानुदास मोरे (रा. देलवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गौरव हरिदास बांडे (वय २४, रा. नंदिनी टकले नगर, मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव बांडे यांच्या आजीचे ८ जुलै रोजी राशीन (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे निधन झाले होते. अंत्यविधीनंतर ते वडील हरिदास बांडे आणि मावसबहीण रेश्मा अतुल दंडे यांच्यासह त्यांच्या भावाच्या मालकीच्या व्होक्सवॅगन पोलो (एमएच-१४ डीए-०३४४) या कारने पुण्याकडे परतत होते.

पुणे-सोलापूर महामार्गावरील राजेंद्र पेट्रोलपंपासमोर, माळी मळा (लोणी काळभोर) येथे समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने गौरव बांडे यांनीही तत्काळ ब्रेक दाबून वाहन नियंत्रित केले. मात्र, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट (एमएच-४२ बीएन-९४१२) या कारच्या चालकाने सुरक्षित अंतर न राखता भरधाव वेगात वाहन चालवून पोलो कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत पोलो कारचा बंपर, बॉनेट तसेच इतर भागांचे मोठे नुकसान झाले.

 

अपघातानंतर स्विफ्टमधील सहप्रवासी बाळासाहेब मोरे हा खाली उतरून फिर्यादी गौरव बांडे यांना अपघातासाठी जबाबदार धरत शिवीगाळ करू लागला. त्यानंतर गौरव बांडे यांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाहनांची पाहणी केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून त्र्यंबक काळे या स्विफ्ट कारच्या चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी, तसेच सहप्रवासी बाळासाहेब मोरे याच्याविरुद्ध शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दीपके, सौरव अन् रांका अडचणीत! दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; 10 ऑक्टोबरपूर्वीच कारवाई….

Thursday, 8 October 2026, 15:34

सरकारी नोकरी पण अन् सुट्या पण! भारतात ‘या’ सरकारी नोकऱ्या करणाऱ्यांना मिळतात सुट्ट्याच-सुट्या; जाणून घ्या सविस्तर माहिती

Thursday, 8 October 2026, 15:22

ताई, माई,आक्का यावर्षीच सोनं घेण्याचा विचार करा पक्का! २०२७ मध्ये सोनं २ लाखांवर जाण्याचं भाकीत; वाचा सविस्तर

Thursday, 8 October 2026, 15:10

सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीला 1200 एकर जमीन? दोन आठवड्यांत 2 GR;अंजली दमानियांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Thursday, 8 October 2026, 15:07

शेवटी नानांचं शेवटचं स्वप्न अपूर्ण राहिलं! स्वतःच्याच अंत्यविधीसाठी काढून ठेवली होती लाकडं; गावकऱ्यांना अश्रू अनावर

Thursday, 8 October 2026, 15:06

चिमुकल्यासमोरच नराधम पित्याने आईला दगडानं ठेचून संपवलं! रक्ताने माखलेल्या बायकोचा व्हिडीओ बनवून स्टेटसला ठेवला; संशयामुळे संसार उध्वस्त

Thursday, 8 October 2026, 14:52
Next Post

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री! बावनकुळेंचा मोठा दावा; संजय राऊतांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp