Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेवटी नानांचं शेवटचं स्वप्न अपूर्ण राहिलं! स्वतःच्याच अंत्यविधीसाठी काढून ठेवली होती लाकडं; गावकऱ्यांना अश्रू अनावर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 8 October 2026, 15:06

पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पहाटे अस्वस्थ वाटत असल्याचा संदेश त्यांनी एका मित्राला केला होता. मित्राने संदेश पाहिल्यानंतर त्यांच्या घरी धाव घेतली असता नाना पाटेकर यांची प्रकृती गंभीर झाल्याचे दिसले. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र सुमारे ४५ मिनिटे उपचार करूनही त्यांना वाचवता आले नाही. पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्याहून पुण्यात आणण्यात येणार असून, पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील डोणजे परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या अखेरच्या निरोपासाठी एकत्र आले आहेत. नाम फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांनी नानांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या शेतातील लाकडे आधीच ठेवून दिल्याचे सांगितले. स्वतःच्या शेतात वाढलेली लाकडेच आपल्या अंत्यसंस्कारासाठी वापरावीत, अशी नानांची इच्छा होती, असेही त्यांनी नमूद केले आहे.

नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याचीही यावेळी आठवण काढली जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य कुटुंबांची परिस्थिती सुधारावी, हे त्यांचे कायमचे स्वप्न असल्याचे गणेश थोरात यांनी सांगितले. यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने महाराष्ट्रात परतल्यानंतर दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्याचा नानांचा मानस होता. मात्र, त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली.

नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. त्यांच्या दमदार अभिनयशैली, प्रभावी आवाज आणि सामाजिक जाणिवेमुळे त्यांना मोठा चाहतावर्ग लाभला होता. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीबरोबरच सामाजिक क्षेत्रातही शोक व्यक्त केला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Friday, 9 October 2026, 17:24

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 17:08

पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक! बाणेर पोलिसांची तत्पर कारवाई; फिर्यादीला परत मिळवून दिले 3 लाख रुपये

Friday, 9 October 2026, 16:48

भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर ,ट्रम्प यांचं नोबेलचं स्वप्न पुन्हा भंगलं!

Friday, 9 October 2026, 16:37

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी 18 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Friday, 9 October 2026, 16:15

MPSC आंदोलकांच्या अडचणी वाढल्या! पुण्यात थेट गुन्हे दाखल; पोलिसांनी कोणावर केली कारवाई?

Friday, 9 October 2026, 16:00
Next Post

सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीला 1200 एकर जमीन? दोन आठवड्यांत 2 GR;अंजली दमानियांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp