Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMC Politics: पुण्यात महायुतीला तडे; जागावाटपावरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 26 December 2025, 18:29

पुणे: पुणे शहराच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडींनी महायुतीच्या एकसंधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरकरणी सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र असले, तरी आतून मात्र सत्तेसाठी एकत्र आलेले मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकल्याची स्थिती आहे. पुण्यात झालेल्या एका गुप्त बैठकीनंतर महायुतीत मोठा भूकंप झाल्याचे संकेत मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने थेट युती तोडण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (PMC Politics)

पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, राज्यातील सत्तेची ‘सेमीफायनल’ मानली जाते. मात्र याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात जागावाटपावरून तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ही खडाजंगी आता चर्चेच्या पातळीवर न राहता थेट संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

यात वादाचे मुख्य कारण म्हणजे भाजपकडून शिवसेनेला देण्यात आलेली जागांची ऑफर. पुण्यासारख्या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात भाजपने शिंदे गटाला केवळ 12 जागांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. ही ऑफर समजताच शिवसेनेच्या स्थानिक नेते आणि पदाधिकारी संतप्त झाले आहेत. पुणे महानगरपालिकेत एकूण 41 प्रभाग असून 165 नगरसेवक निवडले जातात. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाला अवघ्या 12 जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेला अपमानास्पद वाटत आहे.

शिंदे गटाने सुरुवातीला भाजपकडे 35 जागांची मागणी केली होती. पुण्यात शिवसेनेची पारंपरिक ताकद, जुने कार्यकर्ते आणि मतदार आधार लक्षात घेता ही मागणी वाजवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र भाजपने ‘एकहाती सत्ता’ हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून आपल्या मित्रपक्षालाही मर्यादित जागा देण्याची भूमिका घेतल्याचे दिसुन येत आहे. शिंदे सेनेने 35 जागांची मागणी केली असता भाजपकडून 12 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

 

या सगळ्या वादात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गणितही महत्त्वाचे ठरते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच पुण्यात राष्ट्रवादीसोबत युती करणे भाजपला परवडणारे नसल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास त्याचा फायदा विरोधकांना होईल, असा भाजपचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला बाजूला ठेवले, पण आता शिवसेनेलाही नाराज केल्यामुळे पुण्यात महायुतीचे भवितव्यच धोक्यात आले आहे.

शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपने 12 जागांची ऑफर वाढवून  15 जागांपर्यंत नेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिंदे गट 20 ते 25 जागांवर ठाम आहे. केवळ 15 जागांवर निवडणूक लढवणे म्हणजे पक्षाचे अस्तित्व धोक्यात घालण्यासारखे असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे मत आहे. त्यामुळे हा तिढा आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.

शिवसेनेने भाजपला अप्रत्यक्ष अल्टिमेटम दिला असून, समाधानकारक तोडगा न निघाल्यास आपली स्वतंत्र वाटचाल जाहीर केली जाईल, असे संकेत दिले आहेत. सेनेकडून प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून,  29 तारखेला स्वतंत्र उमेदवारांची यादी जाहीरही करणार असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास महायुतीत अधिकृत फूट पडल्याचे स्पष्ट होईल.

एकीकडे भाजप आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पुण्यात पुन्हा बहुमत मिळवण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाला भाजपशिवायही आपले अस्तित्व सिद्ध करायचे आहे. या संघर्षाचा थेट फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता असून, मतांचे विभाजन झाल्यास विरोधकांना संधी मिळू शकते. पुण्यातील ही रणधुमाळी आता केवळ निवडणुकीपुरती न राहता अस्तित्वाच्या लढाईत रूपांतरित झाली आहे. महायुतीचा हा रथ पुढे जाणार की इथेच कोसळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री सायबर डल्ला! गाढ झोपेत मोबाईलवर मेसेजचा पाऊस; सकाळी उठताच बँक खात्यातून पावणेदहा लाख गायब!

Thursday, 22 October 2026, 8:21

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

Thursday, 22 October 2026, 8:03

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Thursday, 22 October 2026, 7:49

महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा वाढणार! गुलाबी थंडीची प्रतीक्षा लांबली; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा?

Thursday, 22 October 2026, 7:33

आज राशींचं नशीब फळफळणार! गुरुवारी जुळले दुर्मिळ योग; धनलाभासह प्रगतीची संधी, वाचा आजचं राशीभविष्य!

Thursday, 22 October 2026, 7:13

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19
Next Post
Shocking News: "It's been a year and a half since we got married, he hasn't even come close"; The 'truth' of the doctor husband came to light and the ground beneath his feet shifted

Shocking News: "लग्नाला दीड वर्ष झालं तो जवळच आला नाही"; डॉक्टर नवऱ्याचं ते 'सत्य' कळलं अन् पायाखालची जमीन सरकली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp