गोरखपूर: एका नवविवाहित महिलेने तिच्या (Shocking News) पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. लग्नानंतर पती कधीही तिच्यासोबत (Breaking News) एकाच खोलीत झोपला नाही. दररोज काही ना काही कारण सांगून तो वेगळ्या खोलीत जात असे. हा प्रकार दीड वर्ष सुरू होता. अखेर सत्य समोर आल्यानंतर महिलेच्या भावाने तिच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

भावाची पोलीस ठाण्यात तक्रार
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गोला पोलीस ठाणे परिसरातील आहे. सहदोडांग गावातील रहिवासी अजय कुमार यांनी आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचारांबाबत पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली आहे. अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, बहिणीचा विवाह 25 एप्रिल 2024 रोजी खजनी पोलीस ठाणे परिसरातील माटोलिया गावातील एका तरुणाशी झाला होता. लग्न मोठ्या थाटामाटात झाले असून सुमारे 15 लाख रुपये रोख हुंडा देण्यात आला होता. यासोबतच वॉशिंग मशीन, शिलाई मशीन, बेड, रंगीत टीव्ही, सोफा सेट, वॉर्डरोब आणि टेबल अशा घरगुती वस्तूही देण्यात आल्या होत्या.
वेगळ्या खोलीत झोपायचा नवरा
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही दिवस सर्व काही सामान्य वाटत होते. मात्र हळूहळू पतीचे वर्तन संशयास्पद होत गेले. दररोज रात्री आजारपण, थकवा किंवा सकाळी लवकर उठायचे आहे, अशी कारणे देत तो वेगळ्या खोलीत झोपत असे. दीड वर्ष उलटूनही पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध झाले नाहीत. विचारणा केल्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात होते.
समोर आलं भयानक सत्य
नंतर पीडितेला समजले की तिचा पती शारीरिकदृष्ट्या अपंग असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे सत्य लग्नापूर्वी लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच पती आणि सासरे दोघेही पशुवैद्य असून चारचाकी गाडी खरेदीसाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. विरोध केल्यावर मानसिक छळ करण्यात आल्याचेही तिने सांगितले.
संपूर्ण प्रकार पालकांना सांगितल्यानंतर सासरच्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. सध्या पीडिता पालकांच्या घरी राहत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







