Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत कोयते फिरवत दहशत; ६ तासांत ४ आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला चंदननगर पोलिसांनी घेतले ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 30 June 2026, 15:47

पुणे, ता. ३० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात भररात्री कोयते हवेत फिरवत, घरांवर दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा चंदननगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला लोखंडी कोयता, दोन मोटारसायकलींसह एकूण १ लाख २० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहुल भास्कर वाणी (वय १८), अनिकेत देविदास वैरागर (वय २०), राहुल सुनील धुरंधर (वय २०) आणि प्रेम गणपती गरड (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास तीन मोटारसायकलींवरून आलेल्या सहा ते सात जणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात धुडगूस घातला. आरोपींनी हातातील धारदार कोयते हवेत फिरवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांच्या घरांवर दगडफेक करून दहशत माजवली.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर राहुल भास्कर वाणी (वय १८), अनिकेत देविदास वैरागर (वय २०), राहुल सुनील धुरंधर (वय २०) आणि प्रेम गणपती गरड (वय १८) यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणातील एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले.

 

तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला एक लोखंडी कोयता आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख २० हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई अत्यंत वेगाने करत अवघ्या सहा तासांत गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करीत आहेत.

सदरची कामगिरी लीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार, चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे तसेच तपास पथकाचे पोलीस हवालदार गोणे, मेमाणे, डांगे, घावटे, घुटे, पोलीस अंमलदार लहाणेपाटील व गायकवाड यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03

‘भक्तांच्या’ नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 1 August 2026, 20:57

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Saturday, 1 August 2026, 20:25

सबळ पुराव्याअभावी प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ; शिवाजीनगर न्यायालयाचा निर्णय..

Saturday, 1 August 2026, 19:30

“‘होय, गुन्हे दाखल करा!’ अभिजीत दीपकेंचं थेट आव्हान; दिल्ली आंदोलनावर मोदींनाही केला सवाल”

Saturday, 1 August 2026, 19:26
Next Post

बिष्णोई टोळी करतेय पुण्यातील व्यापाऱ्यांना 'टार्गेट'? 2 कोटींच्या खंडणीसाठी थेट 'इंटरनेट कॉल'; जीवे मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.