Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 3 August 2026, 22:58

पुणे: खंडाळा घाटमाथ्यावरील निसर्गसौंदर्य पाहण्याच्या नादात एका पर्यटकाची कार थेट 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने दरीतील एका मोठ्या झाडाला कार अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कारचालकाचा जीव वाचला असून पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याची सुरक्षित सुटका करण्यात आली.

मोहित स्वरूप भटनागर (वय 59), सध्या वांद्रे (मुंबई) येथे वास्तव्यास असून मूळचे गुरुग्राम (हरियाणा) येथील आहेत. ते त्यांच्या स्कोडा कारने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटनासाठी आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा घाटमाथ्यावरील निसर्गरम्य परिसर आणि अलीकडेच चर्चेत आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे दृश्य पाहण्यासाठी त्यांनी गारमाळ परिसर गाठला. परिसराचे छायाचित्र टिपण्याच्या उद्देशाने त्यांनी कार सुरक्षित ठिकाणी उभी न करता डोंगराच्या उताराकडे नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन चार ते पाच पलट्या खात सुमारे 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळले. मात्र दरीतील एका मोठ्या झाडाला कार अडकल्याने ती आणखी खाली घसरली नाही. त्यामुळे चालकाचा जीव वाचला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

 

घटनेची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीने कारचालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर घाटमाथा आणि पर्यटनस्थळांवर फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी वाहन नेणे टाळावे, तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी पर्यटकांना केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मागून आला अन् चाकूने केले सपासप वार! पुण्यात महिला अन् चिमुकल्यासमोर तरुणाची निर्घृण हत्या

Friday, 28 August 2026, 10:03

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Friday, 28 August 2026, 9:56

साहेब, शिल्पा गवारेची हत्याच झाली! बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिचा गळफास घेतलेला मृतदेह; प्रकरणाला धक्कादायक वळण

Friday, 28 August 2026, 9:52

त्याचं लग्न ठरलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं… पण अचानक घेतला गळफास; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Friday, 28 August 2026, 9:36

‘तो उठतंच नाहीये, त्याचं अंग थंड पडलंय’ मटणासाठी क्रूरपणे लेकाला संपवल्यावर आईचं खोटं नाटक; भावाला संशय येताच बिंग फुटलं

Friday, 28 August 2026, 9:24

ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबला! शेळ्यांचा कळप समोर येताच कारचा वेग वाढला अन् 6 विद्यार्थी जखमी

Friday, 28 August 2026, 9:20
Next Post

Daily Horoscope: मंगळवारचा महायोग! 'या' राशींना करिअर, पैसा आणि प्रेमात मिळणार मोठं यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp