Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात २० कोटींचा महा-भिशी घोटाळा! दामदुप्पट आमिष दाखवून ३९ जणांची फसवणूक; ३ महिलांसह ५ जणांवर गुन्हा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 15:49

पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे बेकायदेशीरपणे भिशी चालवून गुंतवणुकीची रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे 39 जणांकडून 20 कोटींहून अधिक रक्कम जमा करून तिचा कथित अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

सुलभा शरद नवले (वय 50), नितीन शरद नवले (वय 32), सुहास शरद नवले (वय 30), अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले, सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सुलभा, नितीन आणि सुहास नवले यांना अटक केली असून शिरूर न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. आरोपींनी 2020 मध्ये कारेश्वर भिशी मंडळ सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसतानाही भिशी मंडळ नोंदणीकृत असल्याचे भासवून नागरिकांना गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

ही भिशी डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम आणि परतावा मागितल्यानंतर संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही गुंतवणूकदारांना दमदाटी करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

पोलिसांनी संबंधितांचे जबाब नोंदवून गुंतवणुकीच्या नोंदींची पडताळणी केली. त्यानंतर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासात सोनवणे यांच्यासह सुमारे 39 जणांनी एकूण 20 कोटी 34 लाख 65 हजार 500 रुपये गुंतवल्याचे समोर आले आहे.

ही रक्कम रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने विविध बँक खात्यांमध्ये जमा करून तिचा कथित अपहार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पेरू खाण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; नराधमाला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Thursday, 20 August 2026, 20:33

ओडिशातून गांजा आणणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

Thursday, 20 August 2026, 20:30

लग्न करण्यासाठी खाकी वर्दी घालायची! महिलेचा आरपीएफ अधिकारी असल्याचा बनाव; पोलिसांनी तपासचक्र फिरवली अन् बिंग फुटलं

Thursday, 20 August 2026, 19:54

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक! भाषा चाचणीत अपयशी ठरल्यास थेट परवाना निलंबनाची कारवाई

Thursday, 20 August 2026, 19:17

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! आता सुटे खाद्यतेल विक्रीवरही निर्बंध; एफडीएची कडक मोहीम

Thursday, 20 August 2026, 18:50

‘आता पुढचा नंबर कोणाचा?’ पीएमआरडीएच्या कारवाईने लोणी काळभोरमधील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले; प्लॉटिंग-होर्डिंग चालकांमध्ये भरली धडकी!

Thursday, 20 August 2026, 18:45
Next Post

पुण्यात खळबळ! प्रसूतीदरम्यान ३७ वर्षीय महिला आणि नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp