Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात खळबळ! प्रसूतीदरम्यान ३७ वर्षीय महिला आणि नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 16:21

पुणे : प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३७, रा. कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) असे आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

रूपाली इंदलकर यांना प्रसूतीसाठी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नवजात बाळाचीही प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत मायमर हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

घटनेची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाल्यास एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

 

सुनील शेळके म्हणाले, “रुग्णाचं हित लक्षात घेऊन आरोग्य सेवा दिली पाहिजे. केवळ पैशांसाठी आरोग्य सेवा दिली जात असेल, तर अशा रुग्णालयावर कारवाई करून ते बंद करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर आणि संबंधित रुग्णालय या मृत्यूस जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे.”

या प्रकारापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तीन ते चार घटना घडल्याची माहिती आपल्यासमोर आली असल्याचे शेळके यांनी सांगितले. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री आणि पोलिसांना माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आईचा मृत्यू झाल्यानंतर बाळाला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवे होते, असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महिलेचा सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर बाळाला तातडीने ससून रुग्णालयात हलवणे अपेक्षित होते. मात्र, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाळाला ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, उपचारादरम्यान वैद्यकीय त्रुटी झाल्या होत्या का आणि बाळाला वेळेत उपचार मिळाले का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या सर्व बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत.

दरम्यान, रुग्णाच्या उपचारासंदर्भातील सर्व कागदपत्रे ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, तेथील समितीकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली आहे.

महिला आणि नवजात बाळाच्या मृत्यूमुळे मायमर हॉस्पिटलच्या उपचारपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणातील नेमके सत्य चौकशीनंतर समोर येणार आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

'श्रीमद्भागवत वाचली असती तर अजित पवार वाचले असते' इस्कॉन अध्यक्ष्यांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp