Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता टोलचे टेन्शन मिटले; विनामूल्य प्रवासासाठी ‘असा’ मिळवा तुमचा पास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 July 2026, 18:45

पुणे: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी, भाविक आणि मानाच्या पालख्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वारीसाठी प्रवास करणाऱ्या हजारो वारकरी आणि भाविकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मानाच्या पालख्यांच्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) टोल नाक्यांवर कोणतेही टोल शुल्क आकारले जाणार नाही. ही सवलत केवळ आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांसाठी लागू असेल.

टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘आषाढी एकादशी २०२६’ असा उल्लेख असलेले अधिकृत स्टिकर किंवा पास लावणे आवश्यक राहणार आहे. या स्टिकरवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. हे स्टिकर आणि पास संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस शाखा, वाहतूक चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हेच पास परतीच्या प्रवासातही वैध असतील.

टोल नाक्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक वॉर्डन आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच महामार्ग सुरक्षा पथकांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

याशिवाय, राज्य परिवहन महामंडळाला वारीच्या काळात अतिरिक्त एसटी बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टोलमाफीमुळे संबंधित टोल कंत्राटदारांना होणाऱ्या महसुली नुकसानीची भरपाई राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

Wednesday, 19 August 2026, 19:49

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Wednesday, 19 August 2026, 19:47
Next Post

हडपसर येथील गंधर्व लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या? जमिनीच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल; नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.