Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथील गंधर्व लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या? जमिनीच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल; नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 July 2026, 18:49

लोणी काळभोर, ता. ७ : हडपसर परिसरातील २८ वर्षीय धनराज जयवंत पिसाळ यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. मालमत्ता, पेट्रोल पंप, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक वादातून सातत्याने होत असलेल्या धमक्या व अपमानामुळे धनराज यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या आई आशा पिसाळ यांनी केला आहे. या प्रकरणी नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

धनराज पिसाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सतीश हरिश्चंद्र पिसाळ, हरिश्चंद्र महिपती पिसाळ, अंजना हरिश्चंद्र पिसाळ, आशा सतीश पिसाळ, विश्वनाथ सखाराम दगडे, ज्ञानराज विश्वनाथ दगडे, अनिता विश्वनाथ दगडे, राजेंद्र (आप्पा) भिलारे आणि विनायक पिसाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनराजची आई आशा पिसाळ यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज पिसाळ हे ३ जुलै रोजी सकाळी घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी पुणे-सोलापूर रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनी चौकाजवळील गंधर्व लॉजमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे अंतिम कारण न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (एफएसएल) विषतपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बारामती तालुक्यातील माळवाडी परिसरातील जमिनी, पेट्रोल पंप, घर, गोदामे, वाहने तसेच आर्थिक व्यवहारांवरून गेल्या काही वर्षांपासून गंभीर वाद सुरू होते. फिर्यादी आशा पिसाळ यांच्या पतीच्या निधनानंतर संबंधितांनी जमीन व मालमत्ता बळकावल्याचा, आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देऊन कुटुंबाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व घटनांमुळे धनराज प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते. लग्नसमारंभात सार्वजनिकरीत्या अपमानित केल्याची घटना आणि त्याआधी झालेल्या धमक्यांमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

 

या प्रकरणी सतीश हरिश्चंद्र पिसाळ, हरिश्चंद्र महिपती पिसाळ, अंजना हरिश्चंद्र पिसाळ, आशा सतीश पिसाळ, विश्वनाथ सखाराम दगडे, ज्ञानराज विश्वनाथ दगडे, अनिता विश्वनाथ दगडे, राजेंद्र (आप्पा) भिलारे आणि विनायक पिसाळ या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांची पडताळणी सुरू असून शवविच्छेदन अहवाल, विषतपासणी अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27
Next Post

कचऱ्याचं 'ग्रीन गोल्ड'! दिल्लीच्या बसेसना मिळणार हायड्रोजन इंधन, गडकरींचा मास्टरप्लॅन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.