पुणे: बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैर फायदा घेवुन दागिणे चोरणाऱ्यास पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून जेरबंद केले आहे. हमीद अफसर खान (वय 30 वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, यांना मिळालेल्या गोपनिय बातमी नुसार पोलीस बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांचे दुर्बलतेचा गैर फायदा घेवुन दागिणे चोरनारा हमीद अफसर खान वय 30 वर्षे, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे यास आज दि.19/04/2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल लोणीकाळभोर गाव स्मशानभुमी येथुन ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखा, युनिट 6 येथील कार्यालयामध्ये घेवुन येवुन त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह पुणे शहर व आजुबाजुच्या परिसरामध्ये हातचलाखीने फसवणुक करुन चोरी केल्याचे कबुल केले आहे.
उघडकीस आणलेले गुन्हे खालील प्रमाणे
1. कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.1347/2024 भा.न्या.सं. कलम 316(2), 318(4) अन्वये
2. पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं.29/2025 भा.न्या.सं. कलम 318(4) अन्वये
3. पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. 195/2024 भा.दं.वि. कलम 420.34 अन्वये
4. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. 579/2024 भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये
5. कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. 169/2025 भा.न्या.सं. कलम 316(2). 318(4). 3(5) अन्वये
6. कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. 106/2024 भा.दं.सं. कलम 406, 420, 34 अन्वये
7. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. 547/2024 भा.दं.वि.कलम 420,34 अन्वये
8. सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. 324/2023 भा.दं. वि. कलम 406,170 अन्वये
यावेळी 7,68,000 रुपये किमतीचे 96 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची अपाचे RTR 200 मोटार सायकल जप्त करण्यात आली. तसेच हातचलाखी करुन फसवणुकीचे 8 गुन्हे उघडकीस आणुन 8 लाख 68 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 2) राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा, प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अमंलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती नरवडे, यांनी केली आहे.