Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! आता दरवर्षी PUC काढण्याची गरज नाही; सरकारचा मोठा दिलासादायक प्रस्ताव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 17:09

पुणे: देशभरातील लाखो वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या खासगी BS6 वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता सध्याच्या एका वर्षाऐवजी थेट तीन वर्षे करण्याची तयारी सुरू आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास BS6 वाहनधारकांना दरवर्षी प्रदूषण तपासणी करून PUC प्रमाणपत्र काढण्याची गरज राहणार नाही. अशा वाहनांची प्रदूषण चाचणी दर तीन वर्षांनी एकदाच करावी लागेल. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होण्याची शक्यता आहे.

याच प्रस्तावात सहा ते दहा वर्षे जुन्या BS6 वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी प्रदूषण तपासणी अनिवार्य करण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच जुन्या वाहनांसाठी नियम अधिक कडक करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यानुसार BS4 वाहनांचे PUC प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी नूतनीकरण करावे लागेल, तर BS1, BS2 आणि BS3 वाहनांसाठी दर तीन महिन्यांनी प्रदूषण तपासणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे.

 

BS म्हणजे ‘भारत स्टेज’ उत्सर्जन मानके. वाहनांमधून होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ही मानके लागू केली आहेत. भारतात एप्रिल २०२० पासून BS6 मानके लागू करण्यात आली. BS4 नंतर थेट BS6 मानकांचा अवलंब करण्यात आला असून, BS6 इंजिनमध्ये कमी सल्फरयुक्त इंधनाचा वापर केला जात असल्यामुळे ही वाहने तुलनेने कमी प्रदूषण करतात.

मात्र, हा बदल अद्याप लागू झालेला नाही. केंद्र सरकारने सध्या केवळ मसुदा अधिसूचना जारी केली असून त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यास देशभरातील लाखो BS6 वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुन्हा आंदोलन पेटणार ! विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू ; अभिजित दीपिकेंचा सरकारला इशारा

Wednesday, 29 July 2026, 19:22

न्हावरेत कायदा-सुव्यवस्था धोक्यात? भाडेकरू पडताळणीसाठी नागरिकांचा प्रशासनाला अल्टिमेटम!

Wednesday, 29 July 2026, 18:13

चाकणमध्ये दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या 7 गाड्या जप्त, सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोराला अटक

Wednesday, 29 July 2026, 18:11

जेजुरी पोक्सो प्रकरणात मोठा निकाल! आरोपीला साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा,शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा कडक निर्णय

Wednesday, 29 July 2026, 18:05

शाळा रडारवर! 50 मीटर परिसरात परवान्याशिवाय अन्नविक्रीला ‘नो एन्ट्री’ ; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Wednesday, 29 July 2026, 17:40

इन्स्टाग्रामवरील ‘ती’ स्वस्त जाहिरात पडली महागात; लहान मुलाची टॉय कार मागवणाऱ्या महिलेची तब्बल ३ लाख ७१ हजारांची फसवणूक!

Wednesday, 29 July 2026, 17:05
Next Post

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.