Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इन्स्टाग्रामवरील ‘ती’ स्वस्त जाहिरात पडली महागात; लहान मुलाची टॉय कार मागवणाऱ्या महिलेची तब्बल ३ लाख ७१ हजारांची फसवणूक!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 29 July 2026, 17:05

पुणे: सोशल मीडियावर स्वस्त दरात वस्तू मिळण्याच्या आमिषाला बळी पडून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यात अशाच एका प्रकारात इन्स्टाग्रामवरील टॉय कारच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणाऱ्या महिलेची तब्बल 3 लाख 71 हजार 127 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

तक्रारदार 32 वर्षीय महिला शिवाजीनगर पोलिस वसाहत परिसरात राहते. 17 जुलै ते 24 जुलैदरम्यान तिने इन्स्टाग्रामवर लहान मुलांसाठी कमी किमतीत टॉय कार विक्रीची जाहिरात पाहिली. जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तींनी घरपोच टॉय कार पाठवण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला.

सुरुवातीला नोंदणी शुल्क म्हणून 500 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वाहतूक खर्च, विमा, प्रक्रिया शुल्क, परतावा मिळणार असल्याचे कारण तसेच इतर विविध शुल्कांच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे जमा करण्यास भाग पाडले. टॉय कार मिळेल या अपेक्षेने महिलेने वारंवार रक्कम भरली. मात्र, पैसे भरूनही टॉय कारची डिलिव्हरी झाली नाही.

 

यानंतर आरोपींकडून पुन्हा पैशांची मागणी सुरू राहिल्याने महिलेच्या मनात संशय निर्माण झाला. चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस संबंधित मोबाईल क्रमांक, बँक व्यवहार, इन्स्टाग्राम खाते आणि इतर डिजिटल पुराव्यांची पडताळणी करत आहेत. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील आकर्षक आणि स्वस्त जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवू नये, कोणतेही ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शाळा रडारवर! 50 मीटर परिसरात परवान्याशिवाय अन्नविक्रीला ‘नो एन्ट्री’ ; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Wednesday, 29 July 2026, 17:40

इन्स्टाग्रामवरील ‘ती’ स्वस्त जाहिरात पडली महागात; लहान मुलाची टॉय कार मागवणाऱ्या महिलेची तब्बल ३ लाख ७१ हजारांची फसवणूक!

Wednesday, 29 July 2026, 17:05

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00
Next Post

शाळा रडारवर! 50 मीटर परिसरात परवान्याशिवाय अन्नविक्रीला 'नो एन्ट्री' ; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.