Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणीकंदमध्ये कौटुंबिक वादातून राडा; माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकरसह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण, 8 जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 August 2026, 15:35

लोणीकंद : जुन्या घरगुती मालमत्ता व व्यावसायिक वादातून लोणीकंद (ता. हवेली) येथे दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यात माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर रामचंद्र भुमकर यांच्यासह त्यांच्या मुलाला लाकडी बांबू, दगड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात करण्यात आली आहे. या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला असून लोणीकंद पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शंकर भुमकर यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शंकर भुमकर यांचे भाऊ उध्दव रामचंद्र भुमकर (वय-66) पुतण्या पांडुरंग दत्तात्रय भुमकर (वय-48 ), स्वप्नील दत्तात्रय भुमकर (वय-44) नातु अनिश पांडुरंग भुमकर (वय 19) विनायक स्वप्नील भुमकर (अंदाजे वय 18), सुन स्वाती पांडुरंग, नातु श्रेयश पांडुरंग भुमकर (वय-21), भुमकर (वय-42) व मृणाल स्वप्नील भुमकर (वय-38 सर्व रा. सगुणा निवास लोणीकंद ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर भुमकर हे पत्नी रुपाली आणि मुलगा सिद्धांत यांच्यासह लोणीकंद येथील सगुणा निवास येथे राहतात. त्यांची शिक्षण संस्था तसेच खडी क्रेशरचा व्यवसाय आहे. त्यांच्या सख्ख्या तीन भावांसोबत 2017-18 पासून घरगुती मालमत्ता आणि व्यवसायाचा वाद सुरू असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या वादातून यापूर्वीही शिवीगाळ, धमक्या आणि त्रास दिल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शंकर भुमकर हे घराच्या टेरेसवर 25 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास व्यायाम करत होते. त्यावेळी इमारतीखाली मोठ्याने भांडणाचा आवाज ऐकू आल्याने ते तातडीने खाली आले. त्यावेळी उद्धव भुमकर, पांडुरंग भुमकर, स्वप्नील भुमकर, श्रेयश भुमकर, अनिश भुमकर, विनायक भुमकर, स्वाती भुमकर आणि मृणाल भुमकर हे सिद्धांतला मारहाण करत होते. मुलाला सोडवण्यासाठी शंकर भुमकर मध्ये पडले असता पांडुरंग, स्वप्नील आणि विनायक यांनी दगड, हात आणि लाथा-बुक्क्यांनी त्यांनाही मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. भांडण सोडवण्यासाठी पत्नी आणि मुलगी खाली आल्यानंतर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे.

 

या हल्ल्यादरम्यान उद्धव भुमकर याने खिळे लावलेल्या लाकडी बांबूने सिद्धांतच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर सिद्धांत रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. शेजाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी सिद्धांतला उपचारासाठी प्रथम लोणीकंद पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी दिलेल्या उपचाराच्या यादीच्या आधारे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ससूनमध्ये उपचार सुरू असताना सिद्धांतला उलट्या होऊन प्रकृती बिघडल्याने 26 ऑगस्ट रोजी त्याला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. मुलाच्या प्रकृतीकडे लक्ष देत असल्याने तक्रार देण्यास विलंब झाल्याचे शंकर भुमकर यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणात नातेवाईकांनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव करून मुलगा सिद्धांत याला मारहाण केली तसेच त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांनाही शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली असून, जुन्या कौटुंबिक वादाला हिंसक वळण कसे मिळाले, याचा पोलिस तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59
Next Post

पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; पतीला मारहाण करत खिशातील पैसे लुटले, प्रियकरासह मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp