Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

३०० चौरस फुटांचा छोटासा व्यवसाय ते १० देशांत विस्तार; पुण्याच्या उद्योजकांची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 November 2026, 17:16

पुणे : अवघ्या ३०० चौरस फुटांच्या जागेतून सुरू झालेल्या पुण्यातील मायक्रोटेक पॉलिमर्स या उद्योगाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांच्या संयुक्त भागीदारीतून उभ्या राहिलेल्या या कंपनीला भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (BYST) तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘JRD टाटा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. ‘फास्टेस्ट ग्रोइंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ या श्रेणीतील हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

नवी दिल्लीतील हॉटेल शांग्री-ला इरोस येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. २०१९ मध्ये रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांनी अवघ्या ३०० चौरस फुटांच्या जागेतून मायक्रोटेक पॉलिमर्सची सुरुवात केली होती. मर्यादित साधनसामग्री, जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी अल्पावधीत उद्योगाचा विस्तार केला.

मायक्रोटेक पॉलिमर्सकडून पफ आणि सँडविच पॅनेल उद्योग, प्लॅन्ट टिश्यू कल्चर लॅब तसेच गारमेंट उद्योगासाठी विविध प्लास्टिक उत्पादनांची निर्मिती केली जाते. सध्या देशातील २१ राज्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १० देशांमध्ये कंपनीचे १५० हून अधिक ग्राहक आहेत. निर्यात व्यवसायातही कंपनीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव आणि राज्यसभा खासदार विजय चिंताकायला हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. BYST च्या संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त लक्ष्मी वेंकटरमण वेंकटेशन यांच्यासह उद्योग, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या उद्योजकीय प्रवासात BYST चे मेंटर सौमित्र घोटीकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. व्यवसायवृद्धी, नियोजन, योग्य दिशा आणि व्यावसायिक आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाल्याचे दोन्ही भागीदारांनी सांगितले.

या प्रवासात दोन्ही भागीदारांच्या कुटुंबीयांनी दिलेली साथ आणि प्रोत्साहनही मोलाचे ठरले. कठीण प्रसंगांत मिळालेला आधार आणि विश्वास यामुळे उद्योगाची वाटचाल अधिक बळकट झाली. त्यामुळे हा पुरस्कार केवळ व्यावसायिक यशाचा नसून दोन्ही कुटुंबांच्या त्यागाचा आणि सहकार्याचाही सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हा पुरस्कार संयुक्त मेहनत, BYST च्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, संपूर्ण टीमचे योगदान, ग्राहकांचा विश्वास आणि हितचिंतकांच्या सहकार्याचा गौरव असल्याचे रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांनी सांगितले. भविष्यात जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख अधिक मजबूत करण्यासह उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

Wednesday, 18 November 2026, 19:30

पुण्यात भरवस्तीत संशियितरित्या फिरत होते दोघे; पोलिसांनी विचारपूस करत झडती घेताच असं काही सापडलं की…

Wednesday, 18 November 2026, 19:16

नागरिकांच्या मागणीनंतर आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात!

Wednesday, 18 November 2026, 19:03

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27
Next Post

पुण्यात चोरट्यांचा एटीएमवर डल्ला! सीसीटीव्हीवर कलर स्प्रे मारून 20 लाख 30 हजारांची रोकड लंपास; पोलिसांसमोर मोठं आव्हान...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp