Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाचं भयानक कृत्य! किरकोळ वादातून मित्राचा गळा दाबला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 15 June 2026, 14:28

पुणे : राजगड तालुक्यातील मालवली गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत ताडीच्या नशेत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या १८ वर्षीय मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांमधील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

ही घटना रविवारी दुपारी मालवली येथील राजतोरण शाळेजवळील मैदान परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मैदानाजवळ काही तरुणांमध्ये वाद झाला होता. उपस्थितांनी मध्यस्थी करत तो वाद शांत केला आणि सर्वजण तेथून निघून गेले. मात्र काही वेळानंतर विकास सुरेश जाधव (वय १८) आणि अल्पवयीन मुलगा यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला.

त्यावेळी अल्पवयीन मुलगा ताडीच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. वाद वाढत गेल्यानंतर त्याने संतापाच्या भरात विकासचा गळा दाबण्यास सुरुवात केली. गळा आवळल्याने विकास बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

 

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विकासला तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून संबंधित १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक तपासात परिसरात दारूबंदी असल्याने काही तरुण आणि अल्पवयीन मुले नशेसाठी ताडीचा आधार घेत असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर बेकायदेशीररीत्या उपलब्ध होणाऱ्या नशेच्या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40
Next Post

ओळख ना पाळख तरुणीला भररस्त्यातून ओढत नेले अन् थेट कालव्यात फेकले? मंचर येथील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.