पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित केलेली पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या शहरात नेहमीच्या वेळेनुसार सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. दर गुरुवारी शहरातील विविध भागांत देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो किंवा त्यात कपात केली जाते. मात्र, सणाच्या पार्श्वभूमीवर उद्याची नियोजित पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.








