Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 November 2026, 20:23

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी राज्यात अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. मेट्रोचे विस्तारणारे जाळे, सागरी पूल आणि किनारी मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. अशातच मुंबईच्या वेशीवर तब्बल ५८ हजार ७५४ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी उत्तन-विरार सी लिंक प्रकल्प आकाराला येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्या दोन ते तीन तासांचा वेळ घेणारा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

मुंबईकरांच्या प्रवासाला वेग देणारा अटल सेतू काही वर्षांपूर्वी सुरू झाला. आता त्याहून मोठा सागरी पूल उभारण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. उत्तन ते विरारदरम्यान हा सी लिंक उभारण्यात येणार असून, त्यासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकल्पासाठी एकूण १०४.२८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी २०.२ हेक्टर जमीन उत्तनजवळ निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीचा वापर उत्तनला जोडणारा मार्ग विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. हा मार्ग पुढे वर्सोवा-भाईंदर किनारी रस्त्याला जोडला जाणार आहे.

उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे ५५.१२ किलोमीटर असेल. त्यातील सागरी पुलाची लांबी २४.३५ किलोमीटर, तर जोडमार्गांची एकूण लांबी ३०.७७ किलोमीटर असेल.

जोडमार्गांचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

– उत्तन जोडमार्ग : ९.३२ किलोमीटर
– वसई जोडमार्ग : २.५० किलोमीटर
– विरार जोडमार्ग : १८.९५ किलोमीटर

या प्रकल्पातील सर्वाधिक लांबीचा जोडमार्ग विरारमध्ये उभारण्यात येणार आहे. हा मार्ग थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार असल्याने मुंबई आणि उत्तर भारतादरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

सध्या मरीन ड्राइव्ह ते विरार हे अंदाजे ७५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. मात्र, उत्तन-विरार सी लिंक आणि संबंधित किनारी मार्ग पूर्ण झाल्यानंतर सिग्नलमुक्त प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे हे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पार करता येईल.

याशिवाय भाईंदर ते विरारदरम्यानचा प्रवास केवळ १५ मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या किनारी रिंग मार्गाचे जाळे पूर्ण झाल्यामुळे नरिमन पॉइंट ते विरार प्रवासही अधिक सुलभ होणार आहे.

उत्तन-विरार सी लिंक हा सहा पदरी, पूर्ण प्रवेश नियंत्रित आणि नौकानयनाची सुविधा असलेला सागरी मार्ग असेल. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ५८ हजार ७५४ कोटी रुपये आहे. पहिला टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पाचा विस्तार करून तो वाधवान खोल समुद्रातील बंदराशी जोडण्याचीही योजना आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, किनारी महामार्ग आणि बंदर यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीलाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत सध्या अटल सेतू आणि वांद्रे-वरळी सी लिंक असे दोन प्रमुख सागरी पूल आहेत. याशिवाय वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि उत्तन-विरार सी लिंक यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत.

अटल सेतूची लांबी अंदाजे २१.८ किलोमीटर असून, तो दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा-शेवा परिसराशी जोडतो. तर वांद्रे-वरळी सी लिंक हा ५.६ किलोमीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आहे.

आगामी काळात या नव्या सागरी मार्गांमुळे मुंबई आणि उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान होणार असून, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

Wednesday, 4 November 2026, 20:23

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44

अखेर १५ वर्षांची प्रतीक्षा संपली! थेऊरच्या यशवंत कारखान्याकडून १४ कोटींचे थकीत ऊसबिल वाटप सुरू; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते ५०० शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश

Wednesday, 4 November 2026, 18:20

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! दुष्काळासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर…

Wednesday, 4 November 2026, 18:11

पायलच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर आक्रोश! ‘माझ्या मुलीला न्याय द्या” म्हणत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन

Wednesday, 4 November 2026, 17:58

भोंगवलीत बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

Wednesday, 4 November 2026, 17:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp