Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पायलच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर आक्रोश! ‘माझ्या मुलीला न्याय द्या” म्हणत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 November 2026, 17:58

पुणे : पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायल झांबरे या विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने पायलने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पायलचा पती, सासू-सासरे आणि नणंद यांच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी पायलच्या सासू-सासऱ्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पायलच्या संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.

या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पायलच्या काकू, भाऊ आणि अन्य नातेवाईकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

“आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिला खूप त्रास दिला आणि हे कृत्य करण्यास भाग पाडले. कुणालाही सोडू नका, आरोपींना फाशी द्या,” अशी मागणी पायलच्या काकूंनी केली.

पायलच्या भावानेही आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पायलला सुरुवातीपासून त्रास दिला जात होता. ती खंबीर होती आणि अनेक गोष्टी सहन करत होती. मात्र, अखेर तिच्यासोबत अशी घटना घडली, असे म्हणत भावाने संताप व्यक्त केला. तसेच आरोपींच्या बाजूने कोणत्याही वकिलाने बाजू मांडू नये, अशी मागणीही करण्यात आली.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पायलला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अखेर १५ वर्षांची प्रतीक्षा संपली! थेऊरच्या यशवंत कारखान्याकडून १४ कोटींचे थकीत ऊसबिल वाटप सुरू; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते ५०० शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश

Wednesday, 4 November 2026, 18:20

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! दुष्काळासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर…

Wednesday, 4 November 2026, 18:11

पायलच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर आक्रोश! ‘माझ्या मुलीला न्याय द्या” म्हणत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन

Wednesday, 4 November 2026, 17:58

भोंगवलीत बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

Wednesday, 4 November 2026, 17:43

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05
Next Post

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! दुष्काळासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp