Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सहकार मंत्र्यांचा मोठा निर्णय! भीमा-पाटसच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 April 2026, 20:39

पुणे: पुणे जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या आदेशाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्याचे संचालक मंडळ जैसे थे राहणार असल्याची माहिती संचालक तुकाराम भिकोबा ताकवणे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक संयुक्त संचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी 22 एप्रिल 2026 रोजी कारखान्याबाबत आदेश काढला होता. या आदेशानुसार प्रशासकीय समिती नेमून कारखान्याच्या कामकाजात बदल होणार होते. मात्र हा निर्णय एकतर्फी घेतला गेला असून नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप संचालक तुकाराम ताकवणे यांनी केला.

या आदेशाविरोधात ताकवणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 152 आणि 154 अंतर्गत पुनर्विचार अर्ज दाखल करत थेट मंत्रालयात धाव घेतली. या अर्जात प्रादेशिक संयुक्त संचालक तसेच नियुक्त प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

 

दरम्यान, आदेश देताना नैसर्गिक न्यायदानाचे उल्लंघन झाले का, तसेच निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता होती का, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत आदेशाला स्थगिती दिली.

या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी चर्चा रंगली असून पुढील काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रीस्तरावर हस्तक्षेप झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post

Manohar Mama Bhosale News: बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या भोंदू' मनोहर मामाला पुण्यातून अटक ; सुके बोंबील विकणारा झाला 'स्वयंघोषित महाराज'..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.