Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद, बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई; दुचाकी, दोन तलवारी व कोयता जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 February 2026, 13:55
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

Baramati Crime : बारामती दि.03 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बारामती (Baramati) तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार व कोयत्यासारखी धारदार हत्यारे बाळगताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रूई ब्रिज परिसरात करण्यात आली.

दि.2 फेब्रुवारी रोजी बारामती तालुका पोलीस निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू असताना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. एका होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून एक इसम तलवार व कोयता बाळगून एमआयडीसीकडून भवानी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला.

 

रूई ब्रिजखाली संशयित दुचाकी अडवून तपास केला असता ओंकार रामचंद्र काळे (वय १९ रा. सणसर ता. इंदापूर जि.पुणे) असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्याच्या दुचाकीच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून दोन लोखंडी तलवारी व एक धारदार कोयता मिळून आला. पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी झडती घेऊन ही सर्व हत्यारे तसेच दुचाकी जप्त केली.

यात होंडा युनिकॉर्न दुचाकी (एम.एच. 42 बी.जी 7377) अंदाजे किंमत 30,000 रु.,पितळी मुठ असलेली तलवार ( 67 सेमी) अंदाजे किंमत 1,500 रु, लोखंडी तलवार (45 सेमी) अंदाजे किंमत 500 रु, लोखंडी धारदार कोयता अंदाजे किंमत 300 रु. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 32,300 रु. इतकी आहे. बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी आरोपी ओंकार काळे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक बारामती तालुका आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ मनोज पवार अवधूत शिंदे भारत खारतोडे दादा दराडे यांनी केली आहे.

 

‘कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, धमकावणे किंवा संशयास्पद हालचाली करताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
~सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी

 

कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास किंवा अशा प्रकारांची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच.’
~ चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

 

‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणीही कायदा हातात घेऊ नये, गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारामती पोलिसांचे लक्ष आहे. असे काही अनुचित प्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला तर अशांवर कठोर कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही.’
~ गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Crime News: मैत्रीचा रक्तरंजित अंत! लग्नाच्या मांडवात जाण्यापूर्वी नवरदेवाने मित्राला दगडाने ठेचले, मांडवात जाण्याआधी थेट जेलमध्ये रवाना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.