पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (Amol Balwadkar Viral Video) प्रचार अंतिम टप्प्यात आला असून एकीकडे शहरात थंडीचा कडाका वाढत (Ajit Pawar) असताना दुसरीकडे राजकीय (Pune Mahapalika Nivadnuk) वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत (Lahu Balwadkar) असताना प्रभाग क्रमांक 9 मधील लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत जाऊन (Nilesh Ghaiwal) निवडणूक लढवत असलेले अमोल बालवडकर यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. (Latest Marathi News)

लहू बालवडकर यांनी सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये अमोल बालवडकर आणि निलेश घायवळ मद्य पार्टी करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर बाणेर-बालेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

हे व्हिडिओ शेअर करत लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची असून सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी ही मूल्ये जपली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. संस्कृती ही भाषणातून नव्हे तर कृतीतून दिसते, आणि सुशिक्षित परिसरातील नागरिकांना गोंधळापेक्षा विकासकेंद्रित नेतृत्व हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सुसंस्कृत पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकांना हीच अपेक्षा असते.
काल रात्रीपासून सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात एवढेच नमूद करावेसे वाटते की, राजकारणात टीका… pic.twitter.com/A0xIZdZnQt
— Lahu Balwadkar (@LBalwadkar) January 9, 2026
दरम्यान या प्रकरणावर अमोल बालवडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात ॲनिमेटेड व्हिडिओ बनवण्याचे काम सुरू असून या व्हिडिओंबाबत मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी सांगितले. या व्हिडिओची सत्यता तपासली जावी अशी मागणी करत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इथल्याच नेत्यांनी निलेश घायवळची मदत घेतली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे.
तिकीट नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी भाजप नेतृत्वावर सातत्याने टीका सुरू ठेवली असून या नव्या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चांगलाच रंगताना दिसत आहे.







